रिसोड-वाशिम अपघात

रिसोड-वाशिम मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Risod-Washim Accident: रिसोड-वाशिम मार्गावर रोजच्या वाहतूकातील एका दुचाकीने भयानक अपघात होण्यात दोन व्यक्ती गंभीर जखमांपासून सावळ्या होऊ शकले नाहीत.

रिसोड-वाशिम मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Risod-Washim Accident

रिसोड (Risod-Washim Accident) : रिसोड-वाशिम मार्गावरील ग्राम सवड नजीक साई धाब्याजवळ मंगळवारी (14 जुलै) सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.मृत व्यक्तीचे नाव राजेश गुलाबराव हाडे (वय 45) असून, गंभीर जखमीचे नाव समाधान हिम्मतराव निकम (वय 48) असे आहे. दोघेही गोहगाव हाडे, ता. रिसोड, जि. वाशिम येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही दुचाकीवरून वाशिमहून रिसोडकडे येत असताना साई धाब्याजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक बैलगाडी आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या (Risod-Washim Accident) अपघातात राजेश हाडे यांचा मृत्यू झाला, तर समाधान निकम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी समाधान निकम यांनी प्राथमिक माहितीत बैलगाडी अचानक समोर आल्याने अपघात झाल्याचे सांगितले आहे. अधिकृत तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Aug 23, 2026
वाहनाचे टायर फुटल्याने रिसोडमध्ये भयानक अपघात; 14 जण जखमी

वाहनाचे टायर फुटल्याने रिसोडमध्ये भयानक अपघात; 14 जण जखमी

Risod Horrific Accident: टायर फुटल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने तब्बल चार पलट्या घेतल्या. या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 14 जण जखमी

Jun 24, 2026