जुगार अड्डा छापा

जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा; ३८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

Gambling Den Raid: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत जवळा पांचाळ शिवारातील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार ५०० रूपये

जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा; ३८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

Gambling Den Raid

आखाडा बाळापूर (Gambling Den Raid) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत जवळा पांचाळ शिवारातील शेतातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार ५०० रूपये मुद्देमाल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकी संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव, होमगार्ड पथकाने  जवळा पांचाळ शिवारातील जुगार अड्ड्यावर १७ ऑगस्ट सायंकाळी छापा टाकला यात रोख रक्कम ५५०० व इतर मुद्देमाल असा ३८५०० मुद्देमाल जप्त करून पोलिस कर्मचारी विठ्ठल जाधव फिर्यादीवरून संतोष नागोराव जाधव,जलील लानीमीया पठाण, गुणाजी लक्ष्मण जाधव ,रर्ईस खान शेखखान पठाण,मतीन रहीम खान पठाण , सुरेश दशरथ जाधव रा.जवळापांचाळ विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं पोलिस जमादार संतोष नागरगोजे यांनी सांगितले.

मुरूंबा शिवारात झन्ना मन्ना जुगारावर छापा
हिंगोली : 
वसमत तालुक्यातील मुरूंबा शिवारातील भगवान साहेबराव कदम यांच्या शेत गट नं. १३३ मधील शेतातील एका झोपड्यामध्ये झन्ना मन्ना जुगार सुरू असताना १७ ऑगस्टला वसमत ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. घटनास्थळी नगदी १५२० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज किशन कदम, शाम दामोदर पावडे, गोविंद नामदेव वारे, अविनाश सुभाष कसारे, गजानन नारायण वारे सर्व रा. मुरूंबा ता. वसमत शेख खालेद शेख खादर रा. सम्राट कॉलनी वसमत या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउपनि मिरासे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

मानोरा भाजी मंडी बनली जुगाराचा अड्डा

मानोरा भाजी मंडी बनली जुगाराचा अड्डा

Manora Gambling Den Raid: मानोरा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भाजी मंडी परिसरात दिवसाढवळ्या जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.

Sep 21, 2026
पोलिस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

स्थानिक पोलीस पथकाने सोमवारी उशिरा आखाडा बाळापूर ते येरीकेशन जाणाऱ्या रस्त्यावरील एका बारच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

Jul 07, 2026
टेकाडी परिसरातील जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड; सात जणांवर गुन्हा

टेकाडी परिसरातील जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड; सात जणांवर गुन्हा

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना रंगेहाथ पकडले.

Jun 12, 2026