जिल्हा परिषद शाळा

जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप बंद; विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती

Zilla Parishad School: खेड्रीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दोन हातपंप सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याच्या अडचणीने सामना करावयाची आहे. येथील युवक संघाचे नेते दुरुस्तीसाठी

जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप बंद; विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती

Zilla Parishad School

खेट्रीतील प्रकार; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पातूर (Zilla Parishad School) : पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासंदर्भात युवा सेना (उबाठा शिवसेना) सस्ती सर्कल प्रमुख सय्यद समीर यांनी ३० जून रोजी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हातपंपांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी गरज असताना दोन्ही हातपंप बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.

हातपंपांची त्वरित दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थी व पालकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सय्यद समीर यांनी दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय

खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील दोन्ही हातपंप सुमारे सहा महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शाळेसारख्या मूलभूत सुविधांच्या ठिकाणीही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

"खेट्री येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत बसविण्यात आलेले दोन्ही हातपंप गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास विद्यार्थी व पालकांसह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल."
-सय्यद समीर, युवा सेना सस्ती सर्कल प्रमुख (उबाठा शिवसेना)

संबंधित सामग्री

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

आसोला खुर्द येथे भीषण पाणीटंचाई; तलावातील अनधिकृत मोटार पंप काढण्याची मागणी!

Asola Khurd water shortage: मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथे सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गावातील दोन्ही तलाव आणि कारपा व आसोला खुर्द शिवार

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा, अनेक प्रकल्प आटण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 43.66% पाणीसाठा शिल्लक. सिद्धेश्वर, सीना-कोळेगाव शून्यावर; जायकवाडी 77.08% तर मांजरा 10% वर.

Oct 02, 2026
महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

महाराष्ट्रात पाणीटंचाईचा धोका! भूजल पाणीउपशावर बंदीचे निर्देश

Maharashtra Water Scarcity: राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने पाणीटंचाईचे गंभीर सावट निर्माण झाले आहे. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील भूजल उपशावर निर्बंध

Sep 20, 2026
उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

Sep 02, 2026