कळमेश्वर पालिका प्रशासन

मरडवार लेआउटवासीयांचा पालिकेला समस्यांचा पाढा

Kalameshwar Municipal Administration: कळमेश्वर येथील मरडवार लेआउटवासीयांनी बगीचा, नाला सुरक्षा भिंत व बेवारस डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी केली. नागरिकांना आरोग्य व सुरक्षेच्या अडचणी आहेत.

मरडवार लेआउटवासीयांचा पालिकेला समस्यांचा पाढा

Kalameshwar Municipal Administration

 

बगीचा, नाला सुरक्षा भिंत व बेवारस डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी

कळमेश्वर (Kalameshwar Municipal Administration) : येथील मरडवार लेआउट (तळ्याची पाळ) परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध प्रलंबित समस्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधत नगराध्यक्ष अविनाश माकोडे व मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांना निवेदन सादर केले. निवेदनात नागरिकांनी नमूद केले की, मरडवार लेआउट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून काही भूखंड बांधकामाविना पडून आहेत. हे भूखंड पालिकेने हस्तगत करून त्या ठिकाणी नागरिकांसाठी सुशोभित बगीच्याची निर्मिती करण्यात यावी. तसेच परिसरातील जुन्या विहिरीचा उपसा करून सुरक्षिततेची उपाययोजना करावी, उघड्या नाल्यावर सुरक्षा भिंत उभारावी आणि लेआउटमध्ये मोठ्या प्रमाणात वावरणाऱ्या बेवारस डुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

या (Kalameshwar Municipal Administration) समस्यांमुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. निवेदन देताना राजेश मुंदडा, आनंद कळंबे, प्रवीण मरडवार, गणेश शिरभाते, राजेश भराडे, अनिल धरपाळ, भागवत चोपडे, हितेश भोगे, अतुल श्रीखंडे, रमेश डाबरे, राजेश शिरभाते, शामकांत नेरकर आदी नागरिक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

लातूर शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती द्या!

लातूर शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती द्या!

शहरातील रखडलेली विकासकामे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना आमदार बसवराज पाटील यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

Sep 04, 2026
कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

कोरचीतील रस्ते खड्डेमय; ३ कोटींच्या निधीच्या ‘तुकड्यां’वर सवाल!

नगरपंचायतीचा दर्जा मिळून दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही कोरची शहरातील रस्त्यांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Aug 27, 2026
कळमनुरीत 13 ऑगस्टला &quotढोल बजाओ आंदोलन" नगर परिषदेच्या कारभाराविरोधात नागरिक आक्रमक  

कळमनुरीत 13 ऑगस्टला &quotढोल बजाओ आंदोलन" नगर परिषदेच्या कारभाराविरोधात नागरिक आक्रमक  

Kalamnuri Municipal Council: कळमनुरी शहरातील वाढती घाण, अनियमित पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त कळमनुरी शहरातील नागरिक..

Aug 11, 2026
हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत, नागरिक हैराण

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक मोकाट जनावरांच्या विळख्यात; वाहतूक विस्कळीत, नागरिक हैराण

रविवारी (२९ जून) शहराच्या मध्यवर्ती भागातील महात्मा गांधी चौकात मोकाट जनावरांनी अक्षरशः अड्डा जमवल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

Jun 30, 2026
कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांमध्ये संताप

कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांमध्ये संताप

कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Jun 26, 2026