शक्तीपीठ महामार्ग विरोध

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

Shaktipeeth Expressway: आज प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या टव्हा भागात पथक मोजणी करता आले असता संतप्त शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मोजणीस आलेल्या पथकाला गाव प्रवेश कमानी पासून परत.

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध वाढतो; मोजणीस आलेल्या पथकाला पाठवले परत

Shaktipeeth Expressway

आखाडा बाळापूर (Shaktipeeth Expressway) : हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांतून प्रखर विरोध होत आहे. आज प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या टव्हा भागात  ग्राम महसूल अधिकारी यु.एस.पत्की,एम.पी.खंदारे,एस.मोधे  पथक मोजणी करता आले असता संतप्त शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत मोजणीस आलेल्या पथकाला गाव प्रवेश कमानी पासून परत पाठविले.

शेतकऱ्यांबरोबर वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांनी पिढ्यांन पिढ्या शेती करणारे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जमिनी गेल्यावर लेकरा बाळांनी खायाचे काय ॽ पैसा कीती दिवस पुरणार? असा सवाल करत एक इंच जमीनही देणार नाही असा निर्धार केला.

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला (Shaktipeeth Expressway) शेतकऱ्यांचा विरोध वरचेवर वाढत आहे चार पाच दिवसांपूर्वी बऊर,कांडली भागात कंपनी अधिकारी कर्मचारी बरोबर महसूल विभाग, भुमि अभिलेख कर्मचारी मोजणी करता आले होते यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले त्यांनी मोजणीस प्रखर विरोध दर्शविला व आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना धारेवर धरले सदर बाब शेतकऱ्यांनी आ.संतोष बांगर यांना सांगितल्यावर ते तात्काळ घटनास्थळी आले त्यांनी मोजणी आलेल्या पथकाला मोजणी थांबवून परत जाण्यास सांगितले यावेळी शक्तीपीठ महामार्गात जमीन जाणाऱ्या विविध भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.

यानंतर सोमवारी टव्हा भागात शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी या महामार्गाला आपला विरोध दर्शविला व जमीन देणार नाही म्हणून आले तसे परत पाठविले. यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर,बिट प्रमुख सुनील रिठे, सिताराम मस्के, प्रशांत शिंदे, अतुल मस्के,पिराजी बेले, बालाजी जाधव,  अमित जाधव, परमेश्वर सरकटे,बंडू राठोड,धाबे ,सागर वाढोणकर, गणपत काळे,पोलिस पथक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

Shaktipeeth Expressway Protest: शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी संतप्त शेतकरी गुरूवारी हिंगोलीत दाखल झाले होते. ध्वजारोहनासाठी येणार्‍या पालकमंत्र्यांना जाब...

Sep 17, 2026
कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला हिरवा कंदील; ४४२ किमीच्या सहापदरी महामार्गाने मुंबई–मराठवाडा प्रवासाला मिळणार वेग

मुंबई महानगर प्रदेशाला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Sep 05, 2026
शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

शक्तिपीठ महामार्ग नावाचे भूत गाडुन टाका: माजी खा.राजु शेट्टी 

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी १७ ऑगस्ट सोमवार रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

Aug 17, 2026
शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.

Aug 16, 2026
परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

परभणीत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होईपर्यंत निर्धाराने लढा देऊ चा नारा....!

Parbhani Shaktipith Highway: परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे रविवारी (दि.१६) शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती तर्फे आयोजित एल्गार परिषद करण्यात आली..

Aug 16, 2026