सरकारी रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्न; कळवण उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात;प्रसूत महिलेचा मृत्यू

कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर काही तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 

सरकारी रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्न; कळवण उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात;प्रसूत महिलेचा मृत्यू

Maternal Death

कळवण (Maternal Death) : कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर काही तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटनेनंतर आक्रमक झालेल्या कुटुंबीयांनी रुग्णालयात आंदोलन करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला.

तताणी (ता. बागलाण) येथील संगीता पवार यांना गुरुवारी (दि.१६) प्रसूतीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सुमारे साडेचारच्या सुमारास सिझेरियन पद्धतीने त्यांची प्रसूती करण्यात आली. त्या वेळी माता व नवजात बालक दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शुक्रवारी (दि.१७) सकाळी सुमारे ९ वाजता संगीता यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संगीता पवार यांचे पती तात्या नारायण पवार यांनी गंभीर आरोप करत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे म्हटले आहे. रुग्णाची प्रकृती खालावत असताना वेळेत माहिती न देता उशिरा निर्णय घेतल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप त्यांनी केला.

घटनेनंतर संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार देत वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलिस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर यांनी परिस्थिती समजून घेत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. अखेरीस वैद्यकीय अधीक्षकांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर नातेवाईकांनी तो स्वीकारला.

रुग्ण कल्याण समितीवर प्रश्नचिन्ह
कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू होऊन काही तास उलटूनही वैद्यकीय अधीक्षक उपस्थित नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अनेक डॉक्टर व कर्मचारी निवासी भत्ता आणि वेतनवाढ घेत असूनही वेळेवर उपस्थित राहत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रुग्ण कल्याण समितीही केवळ कागदोपत्रीच असल्याची टीका नातेवाईकांकडून करण्यात आली.

शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी उपचाराची सुविधा असताना शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे व साहित्य खासगी मेडिकलमधून आणण्यास सांगितले जाते, अशीही तक्रार समोर आली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांचा हेतूच प्रश्नचिन्हात आला आहे. काही डॉक्टर खासगी रुग्णालयातही सेवा देत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026