काशीगाव ते अंधेरी थेट कनेक्टिव्हिटी; मेट्रो 9 आजपासून सेवेत

मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे.

काशीगाव ते अंधेरी थेट कनेक्टिव्हिटी; मेट्रो 9 आजपासून सेवेत

Metro Line 9

मुंबई (Metro Line 9) : मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. बहुप्रतिक्षित मेट्रो 9 मार्गिका अखेर प्रवाशांसाठी खुली होत असून, दहिसर ते मिरा-भाईंदर परिसरातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. काशीगाव ते गुंदवली (अंधेरी) या दरम्यानची सेवा आजपासून सुरू होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीचा विचार करून मेट्रो प्रशासनाने वेळापत्रक आखले आहे. पहिली गाडी पहाटे 5.50 वाजता काशीगावहून सुटेल, तर शेवटची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. गर्दीच्या वेळेत सहा मिनिटांच्या अंतराने गाड्या धावतील, तर इतर वेळात आठ ते दहा मिनिटांनी सेवा दिली जाईल.

या मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये दहिसर पूर्व (कनेक्टिव्हिटी पॉईंट), पांडुरंगवाडी, मिरागाव, काशीगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगत सिंग गार्डन आणि सुभाषचंद्र बोस स्टेडियम यांचा समावेश आहे.

दरम्यान, मेट्रो लाईन 2B च्या पहिल्या टप्प्याचीही माहिती समोर आली आहे. सुमारे 5.38 किमी लांबीच्या या टप्प्यात पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता सुटेल, तर शेवटची सेवा रात्री 10.15 ते 10.30 दरम्यान असेल. या मार्गावर साधारण 9 मिनिटे 30 सेकंदांच्या अंतराने गाड्या धावतील आणि दिवसाभरात एकूण 209 फेऱ्या होणार आहेत.

या नव्या सेवेमुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या घटेल. विशेषतः काशीगाव आणि मिरा रोड परिसरातील प्रवासी आता मेट्रो 7 च्या माध्यमातून थेट अंधेरीपर्यंत सहज पोहोचू शकतील. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन पर्यावरणीय प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईतील मेट्रो जाळे झपाट्याने विस्तारत असून, शहरात विविध मार्गिका कार्यान्वित किंवा उभारणीच्या टप्प्यात आहेत. वर्सोवा-घाटकोपर (लाईन 1), दहिसर ते अंधेरी (लाईन 2A), डी.एन. नगर ते मंडाले (लाईन 2B), कफ परेड ते आरे (लाईन 3), वडाळा ते कासारवडवली (लाईन 4), ठाणे ते कल्याण (लाईन 5), लोखंडवाला ते विक्रोळी (लाईन 6), दहिसर ते गुंदवली (लाईन 7), गुंदवली ते विमानतळ (लाईन 7A), दहिसर ते मीरा-भाईंदर (लाईन 9) अशा अनेक मार्गिका मुंबईच्या वाहतुकीला नवे रूप देत आहेत. भविष्यात गायमुख-मीरा रोड (लाईन 10), वडाळा-सीएसएमटी (लाईन 11) आणि कल्याण-तळोजा (लाईन 12) या मार्गिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

संबंधित सामग्री

अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

अनंत चतुर्दशीला मुंबईकरांना मोठा दिलासा; मेट्रो लाईन-3 रात्रभर धावणार, विसर्जनानंतर घरी परतणे होणार सोपे

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीला मुंबई मेट्रो-3 रात्रभर धावणार. गर्दी आणि वाहतूक कोंडीच्या काळात भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मोठा दिलासा.

Sep 24, 2026
गणेशोत्सवात मुंबईत रात्री उशिरापर्यंत बेस्ट बस; मेट्रो-3 सेवाही मध्यरात्रीपर्यंत

गणेशोत्सवात मुंबईत रात्री उशिरापर्यंत बेस्ट बस; मेट्रो-3 सेवाही मध्यरात्रीपर्यंत

गणेशोत्सवात मुंबईत रात्रीच्या प्रवासासाठी बेस्टच्या 26 जादा बसगाड्या धावणार असून, मेट्रो-3ची सेवाही 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

Sep 07, 2026
मीरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास होणार सुसाट! नायगाव खाडीवर मेट्रोसह सहापदरी दुमजली पुलाला मंजुरी

मीरा-भाईंदर ते वसई-विरार प्रवास होणार सुसाट! नायगाव खाडीवर मेट्रोसह सहापदरी दुमजली पुलाला मंजुरी

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या दोन महत्त्वाच्या भागांना थेट जोडणाऱ्या नायगाव खाडीवरील दुमजली पुलाच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.

Sep 04, 2026
मिरा भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; स्कूल बस थोडक्यात बचावली, सुरक्षेवर गंभीर प्रश्न

मिरा भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; स्कूल बस थोडक्यात बचावली, सुरक्षेवर गंभीर प्रश्न

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Aug 17, 2026
मुंबईत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर खळबळजनक संदेश

मुंबईत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर खळबळजनक संदेश

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Aug 07, 2026