सांगली मध्ये अनैतिक संबंधांना विरोध केल्याने मुलाकडून आईची हत्या; मिरज तालुक्यातील मानमोडी येथे खळबळ

सांगली जिल्ह्यात आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सांगली मध्ये अनैतिक संबंधांना विरोध केल्याने मुलाकडून आईची हत्या; मिरज तालुक्यातील मानमोडी येथे खळबळ

Mother Murder Case

सांगली (Mother Murder Case) : सांगली जिल्ह्यात आई–मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी गावात 28 वर्षीय मुलाने स्वतःच्या आईचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. कुपवाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला काही तासांतच अटक केली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव संगीता जीवन झेंडे (वय 51) असे आहे, तर आरोपी मुलगा जगदीश जीवन झेंडे (वय 28) असा आहे.

कुटुंबातच वादाची ठिणगी

मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंब मानमोडी येथील झेंडा मळा परिसरात वास्तव्यास आहे. बुधवारी सायंकाळी कुटुंबप्रमुख जीवन झेंडे हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. घरात आई संगीता आणि मुलगा जगदीश असे दोघेच होते. यावेळी घरगुती कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला.

जगदीशचा विवाह झालेला असून त्याची पत्नी सोनाली सध्या माहेरी राहत आहे. तिला पुन्हा घरी आणण्याच्या मुद्द्यावरून आई–मुलामध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

अनैतिक संबंधांचा वाद ठरला कारणीभूत

दरम्यान, जगदीशचे गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्या महिलेला घरी आणण्याचा त्याचा हट्ट होता. मात्र, या गोष्टीला आई संगीता यांचा कडाडून विरोध होता. बुधवारी रात्री याच कारणावरून वाद अधिक तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले.

संतापाच्या भरात घेतला टोकाचा निर्णय

वाद चिघळल्यानंतर संतापाच्या भरात जगदीशने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने आईचे नाक, तोंड आणि गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर तो तातडीने घरातून फरार झाला.

सकाळी उघडकीस आला प्रकार

गुरुवारी सकाळी रात्रपाळीवरून परतलेल्या जीवन झेंडे यांनी घरात प्रवेश केला असता पत्नी संगीता यांचा मृतदेह पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांची झटपट कारवाई

घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि प्राथमिक तपास पूर्ण करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

तपासाची दिशा स्पष्ट होताच पोलिसांनी काही तासांतच आरोपी जगदीश झेंडे याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

गुन्हा दाखल; तपास सुरू

या प्रकरणी मृत संगीता झेंडे यांचे भाऊ बजरंग काशीद यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

परिसरात संताप आणि हळहळ

पोटच्या मुलानेच आईचा जीव घेतल्याची घटना समोर आल्याने मानमोडी परिसरासह पंचक्रोशीत संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. आई–मुलाच्या नात्यावरील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

“पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप”; पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा ठाकरे-राऊतांवर पलटवार; पुराव्याशिवाय आरोप होत असल्याचा दावा करत दिशा सालियन प्रकरणावरही सवाल.

Oct 02, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026