MSEDCL

महावितरणची परवानगी न घेता ६३ केव्हीचे रोहित्र व वीजवाहिन्या उभारल्या; सेनगाव पोलिसांत गुन्हा

महावितरण कंपनीची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा मंजुरी न घेता परस्पर ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र, उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनी उभारल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

महावितरणची परवानगी न घेता ६३ केव्हीचे रोहित्र व वीजवाहिन्या उभारल्या; सेनगाव पोलिसांत गुन्हा

MSEDCL

 

सेनगाव (MSEDCL) : महावितरण कंपनीची कोणतीही पूर्वपरवानगी किंवा मंजुरी न घेता परस्पर ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र, उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनी उभारल्याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ जून रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर २५ जून रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमुळे वीजचोरी आणि अनधिकृत वीजजाळ्यांच्या प्रकरणात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणचे सहाय्यक अभियंता नितीन प्रकाश परळकर यांनी या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, १८ जून २०२६ रोजी मौजे उमरदरी आणि अडोळ शिवारात अनधिकृतपणे वीजवाहिन्या व ६३ केव्ही क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले.

महावितरणची कोणतीही कायदेशीर मंजुरी न घेता शेतामध्ये हे वीजजाळे बेकायदेशीररित्या उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात उत्तमराव शिंदे (रा. खिल्लार) आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवन चाटसे पुढील तपास करत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026