मल्हारपुरच्या पाणंद रस्त्यावर भीस!

शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीचा पक्का रस्ता म्हणजे पाणंद रस्ता.

मल्हारपुरच्या पाणंद रस्त्यावर भीस!

Muddy Roads

पावसाळ्यात रस्ता होतो चिखलमय

भिवापूर/मालेवाडा (Muddy Roads) : शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठीचा पक्का रस्ता म्हणजे पाणंद रस्ता. मातोश्री रस्ता योजनेतंर्गत पाणंद रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मात्र, मल्हारपुरच्या पाणंद रस्त्यावर मुरमाऐवजी माती मिश्रित पांढरी भिसचर वापर केला असून, योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.

शेतकऱ्यांची तक्रार

भिवापूर तालुक्यातील घाबरला ग्रामपंचायत अंतर्गत मल्हारपूर येथे महादेव वराडे ते रोशन राऊत यांच्या शेतापर्यंत बाराशे मीटरचे मातीकाम व मजबुतीकरण मातोश्री पाणंद रस्ता योजनेत मंजूर झाले. रस्त्याचे मातीकाम झाल्यानंतर मजबुतीसाठी पक्का मुरूम पसरला जातो. परंतु, कंत्राटदार मुरमाऐवजी गावातीलच एका शेतकऱ्यांच्या शेतातील माती मिश्रीत पांढरी भीस रस्त्यावर टाकली. भिस टाकल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. जो पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी आहे. तोच पाणंद रस्ता त्रासदायक ठरला आहे. मुरमाऐवजी भिस पसरवून कामाचा दर्जा निकृष्ट करण्यासोबत कामात अनियमितता करण्यात आली.

त्यामुळे मल्हारपूर येथील पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी रामकृष्णा राऊत यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतात किंवा नाल्यात उपलब्ध मुरूम टाकण्याची मुभा

दरम्यान, सहाय्यक अभियंता राहुल रागोर्ते यांना याविषयी विचारणा केली असता, सदर योजनेत गावालगत एखाद्याच्या शेतात किंवा नाल्यात मुरूम उपलब्ध असल्यास तो रस्त्यावर टाकण्याची मुभा आहे, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित सामग्री

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर मध्ये अंबिका नगरात तान्हा पोळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंबिका नगर येथे बाळ मित्र शिव सेवा मंडळाच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त महाआरती, नंदी बैल पूजा, गोपालकाला आणि बक्षीस वितरणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 10, 2026
नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपुरात गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीवर बंदी; ३ सप्टेंबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

नागपूर शहरात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे.

Sep 03, 2026
टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

टवेटोला गावाचा दोन किलोमीटर रस्ता अजूनही ‘कागदावर’; पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य!

Tavetola Village Road: पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

Aug 31, 2026
‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

‘आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही’; नितीन गडकरींच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यामुळे भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2026
नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपुरात क्लोरीन गॅसची गळती; 52 जण रुग्णालयात, 200 मीटर परिसर सील

नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरीन गॅसची गळती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Aug 24, 2026