Mumbai Local Train

मुंबई लोकलमधील गर्दीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर; लोकलच्या दरवाजात उभं राहणं ठरलं जीवघेणं; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई लोकलमधील वाढती गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना सलग दुसऱ्या दिवशी समोर आल्या आहेत.

मुंबई लोकलमधील गर्दीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर; लोकलच्या दरवाजात उभं राहणं ठरलं जीवघेणं; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mumbai Local Train

गर्दीमुळे दरवाजात उभ्या असलेल्या साईराज बेणारेचा हात सटकला; लोखंडी रॉडला अडकून गंभीर दुखापत

मुंबई : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना सलग दुसऱ्या दिवशी समोर आल्या आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करताना २७ वर्षीय साईराज बेणारे याचा मुंब्रा परिसरात पडून मृत्यू झाला. गर्दीमुळे दरवाजात उभ्या असलेल्या साईराजचा हात सटकला आणि तो मुंब्रा ब्रिजवरून थेट खाडीत पडला. या वेळी लोखंडी रॉडला आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, साईराज बेणारे हा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होता. लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने त्याला डब्यात आत जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे तो दरवाजाजवळ उभा होता. प्रवासादरम्यान अचानक त्याचा हात सटकला आणि तो मुंब्रा ब्रिजवरून खाली खाडीत पडला.

खाली पडताना साईराज ब्रिजच्या लोखंडी रॉडला अडकला. या दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलीस आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ बचावकार्य केल्यानंतर साईराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

साईराजच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

सलग दुसऱ्या दिवशी लोकलमधून पडून मृत्यू

दरम्यान, याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारीही धावत्या लोकलमधून पडून एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. मोहम्मद फाजील अन्सारी हा मित्रांसोबत मुंबईत फिरण्यासाठी आला होता. लोकलने प्रवास करत असताना कळवा रेल्वे स्थानकाजवळ त्याचा हात सटकला आणि तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला.

या दुर्घटनेत मोहम्मद फाजीलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सलग दोन दिवस लोकलमधून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याने मुंबईच्या लोकलमधील गर्दी आणि दरवाजात उभे राहून प्रवास करण्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026