स्ट्रिट लाईट आंदोलन

स्ट्रीट लाईट सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Street Light Andolan: पुनीसतील सिटी काउन्सिलने स्ट्रिट लाईट पुन्हा सुरू केले असून, वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी तातडीने दखल घेण्याचा आंदोलन शुरू केला आहे.

स्ट्रीट लाईट सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Street Light Andolan

कळमनुरी (Street Light Andolan) : शहरातील कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली स्ट्रीट लाईट व्यवस्था पुन्हा एकदा बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्ते आणि परिसर अंधारात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही शहरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कॅन्डल आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत स्ट्रीट लाईट सुरू केले होते मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण शहरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याचा आरोप वंचित बहुजन युवक आघाडीने केला आहे.

रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून अपघात व अनुचित घटनांची भीती वाढली आहे. शहरातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्नही यामुळे ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शहरातील (Street Light Andolan) स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीने केली आहे.

येत्या दोन दिवसांत स्ट्रीट लाईट सुरू न झाल्यास नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम यांनी दिला आहे. दरम्यान, नागरिकांनीही शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली असून नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

राजुरा न्यायालयासमोर दिवसाढवळ्या गोळीबार; ‘पापा’ जाधवची हत्या

Papa Jadhav murder: राजुरा न्यायालयासमोर प्रदीप बारजवळ सोमवारी सायंकाळी दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शहरात खळबळ उडाली. अज्ञात हल्लेखोरांनी सोमनाथपूर वॉर्डातील विनोद उर्फ ‘पापा’ जाधव यांच्यावर गोळीबार

Aug 24, 2026
‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

‘देशोन्नती’चा दणका: पातूरच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील ‘त्या’ जीवघेण्या खड्ड्यावर प्रशासन जागे

Patur Road Pothole: या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासकीय यंत्रणा तातडीने हरकतीत आली असून, रविवारी/सोमवारी जेसीबी, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन खड्ड्यामध्ये मुरूम व खडी.

Jul 28, 2026