Mumbai Toll Rate Hike

१ ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल महागला; ट्रक-बसमागे ३५ रुपये अधिक

मुंबईतील ५ टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून टोलवाढ लागू झाली. मिनी बस, ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठी नवे दर जाणून घ्या.

१ ऑक्टोबरपासून मुंबईतील टोल महागला; ट्रक-बसमागे ३५ रुपये अधिक

Mumbai Toll Rate Hike

वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून नवे दर लागू; मिनी बस, ट्रक, बस आणि अवजड वाहनांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार

मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या खर्चात आता वाढ झाली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या पाच प्रमुख टोलनाक्यांवरील टोलदर १ ऑक्टोबरपासून वाढवण्यात आले आहेत. वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या टोलनाक्यांवर नव्या दरानुसार वाहनचालकांकडून टोलवसुली केली जाणार आहे. वाहनांच्या प्रकारानुसार १५ ते ३५ रुपयांपर्यंत ही वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या पाचही टोलनाक्यांसाठी सुधारित दर लागू केले आहेत. त्यानुसार मिनी बस आणि एल.सी.व्ही. वाहनांसाठी आता ९० रुपये टोल आकारला जाईल. ट्रक आणि बससाठी १८० रुपये, तर अवजड वाहनांसाठी २२५ रुपये टोल द्यावा लागणार आहे.

यापूर्वी मिनी बस आणि एल.सी.व्ही. वाहनांसाठी ७५ रुपये टोल आकारला जात होता. नव्या दरामुळे या वाहनांच्या टोलमध्ये १५ रुपयांची वाढ झाली आहे. ट्रक आणि बससाठी आधी १५० रुपये टोल होता, तो आता १८० रुपये करण्यात आला असून, या वाहनांच्या टोलमध्ये ३५ रुपयांची वाढ झाली आहे. अवजड वाहनांसाठी पूर्वी १९० रुपये टोल आकारला जात होता; आता त्यासाठी २२५ रुपये द्यावे लागणार आहेत.

मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईत ५५ उड्डाणपूल उभारले आहेत. या प्रकल्पांसाठी झालेला खर्च वसूल करण्याच्या उद्देशाने वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या पाच ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले असून, तेथून टोलवसुली सुरू आहे.

महत्त्वाचे म्हणजे या पाच टोलनाक्यांवरील टोलवसुली २०२७ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आता प्रत्येक फेरीसाठी वाढीव टोलचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026