Mumbai Vidhan Bhavan

मुंबई विधान भवनाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; तपासणीनंतर ई-मेल ठरला बनावट

Mumbai Vidhan Bhavan: राज्याच्या विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच मुंबईतील विधान भवनाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.

मुंबई विधान भवनाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; तपासणीनंतर ई-मेल ठरला बनावट

Mumbai Vidhan Bhavan

 

विधान भवनासह मंत्रालय, मेट्रो स्टेशन आणि स्टॉक एक्सचेंजलाही लक्ष्य करण्याचा उल्लेख
पोलिसांची तातडीने तपासणी

मुंबई (Mumbai Vidhan Bhavan) : राज्याच्या विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच मुंबईतील (Mumbai Vidhan Bhavan) विधान भवनाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. शुक्रवारी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसरात कसून तपासणी सुरू केली. मात्र सखोल शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर हा ई-मेल बनावट (Hoax) असल्याचे स्पष्ट झाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये शुक्रवारी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता. (Mumbai Vidhan Bhavan) विधान भवनाबरोबरच मंत्रालय, मेट्रो स्टेशन आणि स्टॉक एक्सचेंज यांचाही संभाव्य लक्ष्यांमध्ये उल्लेख करण्यात आला होता. सुट्टीचा दिवस असूनही पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता निर्धारित सुरक्षा प्रक्रियेचे (SOP) पालन करत संपूर्ण विधिमंडळ परिसराची सखोल तपासणी केली. बॉम्ब शोधक पथके आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांनी परिसराची पाहणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

यापूर्वीही (Mumbai Vidhan Bhavan) विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. आता पुन्हा अधिवेशनाच्या काळातच अशी धमकी आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार अशा प्रकारचे बनावट ई-मेल पाठवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या घटनांकडे तपास यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे.

संबंधित सामग्री

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026
CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

CJP आंदोलनात तुकाराम मुंढेंचे पोस्टर; मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPचे शिवाजी पार्कात आंदोलन; तुकाराम मुंढेंना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी, तरुणांचा मोठा सहभाग.

Oct 02, 2026
ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला; आता मेट्रो सिनेमापासून होणार सुरुवात

राज-उद्धव ठाकरेंच्या 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग बदलला. आता भायखळ्याऐवजी मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार.

Oct 02, 2026
मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांकडून अटक; हिरानंदानीतील प्रकरणात कारवाई

हिरानंदानीतील विकासकाच्या तक्रारीनंतर मनसे नेते गणेश चुक्कल यांना पवई पोलिसांनी अटक केली. फसवणूक आणि खंडणी प्रकरणात चौकशी सुरू.

Oct 02, 2026