वसमत नगर पालिका

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

Vasmat Municipal Council: वसमत नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द, यामध्ये काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे शेख हबीब शेख बशीर

वसमत नगर पालिकेच्या दोन नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द 

Vasmat Municipal Council

 

अनाधिकृत बांधकाम प्रकरण भोवले

वसमत (Vasmat Municipal Council) : वसमत नगरपालिकेच्या दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केला. यामध्ये काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहमान व राष्ट्रवादीचे शेख हबीब शेख बशीर यांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे दोन ज्येष्ठ नगरसेवक अपात्र ठरले आहेत या प्रकारामुळे वसमत शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

वसमत (Vasmat Municipal Council) येथील शेख अजहर शेख मन्नान यांनी काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल हाफिज अब्दुल रहेमान यांनी गैरकायदेशीर बांधकाम केलेले असल्यामुळे त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचे विनंती केली होती.

तर सय्यद मुजीब शेख जानी यांनी तक्रार दिली होती की राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख हबीब शेख बशीर यांनी अतिक्रमण व अवैध बांधकाम केली असल्याची तक्रार दिली होती
सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी हिंगोली यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून अहवालाचे अवलोकन करून व कागदोपत्री पुरावे विचारात घेऊन  17 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला आहे.
या आदेशामुळे वसमत शहरात व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अब्दुल हाफिज अब्दुल रहमान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. वसमत नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख हबीब शेख बशीर हे माजी नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नगरपालिकेतील दोन ज्येष्ठ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने नगरपालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. नगरपालिका सदस्यांनी अनधिकृत बांधकाम करणे व अतिक्रमण करणे हे त्यांच्या सदस्यत्व पदासाठी घातक ठरले आहे. आता याप्रकरणी पुढे काय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही प्रकरणात नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर तक्रार झाली होती. या दोन्ही प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली होती. दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्याननी ऐकून सोमवारी 17 ऑगस्टला हा निकाल दिला आहे.

संबंधित सामग्री

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

अखेर 'त्या' 175 चौरस मीटर  जागेवरील टिनशेड नगरपालिकेने केले उद्ध्वस्त 

Vasmat Municipal Council Action: नगर परिषदेच्या मालकीच्या 175 चौ.मी. जागेबाबत सुरू असलेल्या वादावर मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यानी निर्णायक कारवाई केली आणि नगरपरिषद प्रशासनाने टिनशेड काढून..

Sep 30, 2026
वसमत न.प. उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला; मात्र संधी कोणाला, यावर अद्याप निर्णय नाही

वसमत न.प. उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला; मात्र संधी कोणाला, यावर अद्याप निर्णय नाही

वसमत नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी मुहूर्त निश्चित झाला असून, २७ ऑगस्ट रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

Aug 22, 2026
'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

'आंधळं दळतं अन् कुत्रं पीठ खातं...' लातूरच्या महानगरपालिकेत आयुक्तांचे आदेश प्रभावहीन!

Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेत आयुक्तांनी काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी तात्काळ किंवा विहित वेळेत होतच नाही, उलट आयुक्तांचे आदेश धूळ खात पडलेले असतात. हे आदेश धूळ खात पडण्यासाठी

Aug 11, 2026
शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Farmers Thiya Andolan: कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानातील अनुदान अपहार करण्याच्या आरोपावर कारवाईकरिता कडक मागणी करून आंदोलन केले.

Aug 10, 2026
रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोडमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर प्रशासनाचा दणका!

रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानपट्टी व किराणा दुकानांवर पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई केली.

Aug 08, 2026