पानटपरी चालकाचा भरदिवसा खून; तीन आरोपी अटकेत

शहरातील काश्मीर नगर परिसरात भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पानटपरी चालकाचा भरदिवसा खून; तीन आरोपी अटकेत

Murder Case

अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याने समजावून सांगितल्याच्या कारण

नेर (Murder Case) : शहरातील काश्मीर नगर परिसरात भरदिवसा घडलेल्या खुनाच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पान टपरी व कोल्ड्रिंक व्यवसाय करणारे शेहेबाज हसन तसदीक हसन पठाण (४०), रा. काश्मीर नगर, नेर यांचा तीन युवकांनी चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही घटना दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मृतकाच्या अल्पवयीन मुलीने काही युवकांकडून छेडछाड होत असल्याची तक्रार वडिलांकडे केली होती. त्यानंतर शेहेबाज यांनी संबंधित युवकांना समज देत मुलीला त्रास देऊ नये, असे बजावले होते. याच कारणावरून हा वाद चिघळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी शेहेबाज आपली पान टपरी बंद करून मोटारसायकलने घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘आम्हाला का समज देतोस’ असा जाब विचारत त्यांना दुचाकीवरून खाली ओढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी चाकूने छाती व पोटावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांचा भाऊ जावेद बचावासाठी धावला, मात्र तोपर्यंत शेहेबाज रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जावेद यांच्या फिर्यादीवरून नेर पोलिसांनी मोहम्मद साहिल मोहम्मद इसराईल (रा. काजीपुरा), फैजान खान जमील खान उर्फ सोनू व उजेब खान एजाज खान (दोघे रा. पठाणपुरा, नेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेराणी करीत आहे.

संबंधित सामग्री

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026