Murder Case

दारू पिऊन जेवणासाठी थांबल्यानंतर सहकाऱ्याचा खून; २० दिवसांनंतर आरोपी नांदेडमधून जेरबंद

वादातून टॉवेलने हात बांधून गळ्यातील गमछ्याने गळा आवळून सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद केले.

दारू पिऊन जेवणासाठी थांबल्यानंतर सहकाऱ्याचा खून; २० दिवसांनंतर आरोपी नांदेडमधून जेरबंद

Murder Case

कामाच्या कारणावरून लांजी शिवारात झाला होता वाद; अहमदपूर पोलिसांची कारवाई

लातूर (Murder Case) : अहमदपूर येथे दिवसभर मिस्त्रीचे काम करून संध्याकाळी मजुरीचे पैसे घेतल्यानंतर दारू पिऊन लांजी गावाजवळील गायरान परिसरात जेवणासाठी थांबलेल्या दोन सहकाऱ्यांमध्ये कामाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून टॉवेलने हात बांधून गळ्यातील गमछ्याने गळा आवळून सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद केले.

सुमारे २० दिवसांपूर्वी गोविंद फटाटे (रा. नावंदी, ता. उदगीर, जि. लातूर) यांचा लांजी शिवारातील गायरान परिसरात खून झाला होता. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपी बालाजी बाबू जाधव (वय ३९, रा. मुगाव तांडा, ता. नायगाव, जि. नांदेड) हा गुन्ह्यानंतर फरार होता. दरम्यान, तो नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळील सलगरा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.

आरोपी तेथे येताच त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.

ही कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे तसेच पोलीस अमलदार तुराबखान पठाण, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेष सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी पार पाडली.

संबंधित सामग्री

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

तब्बल पंधरा वर्षांनंतर मिळाले आधार कार्ड; तहसीलदारांच्या हस्ते वितरीत 

Nanded Aadhar card: गत पंधरा वर्षांपासून आधार कार्ड नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासह दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडचणींचा सामना करणाऱ्या संजय डोमाजी दालपे यांना नितीन हातमोडे, सेतू केंद्र..

Oct 07, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026