Naldurg Fort

धाराशिव प्रकरणात नवा खुलासा; तीन मुलांसह अश्विनी पौळ यांची उडी; मुलांसह किल्ल्यावर जाण्यापूर्वी केला होता केक कट

नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.

धाराशिव प्रकरणात नवा खुलासा; तीन मुलांसह अश्विनी पौळ यांची उडी;  मुलांसह किल्ल्यावर जाण्यापूर्वी केला होता केक कट

मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट आढळले; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा, कौटुंबिक त्रासाचा आरोप

नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरुजावरून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याच्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. एका मुलीची प्रकृती गंभीर असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेच्या तपासादरम्यान आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्विनी पौळ मुलांना घेऊन किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वी केक घेऊन गेल्या होत्या. मुलांसोबत केक कापल्यानंतर त्यांनी आधी मुलांना बुरुजावरून खाली फेकले आणि त्यानंतर स्वतः उडी घेतल्याचे तपासातून समोर आल्याची माहिती आहे.

किल्ल्यावर जाण्यापूर्वी केला केक कटिंग

अश्विनी पौळ आपल्या तीन मुलांना सोबत घेऊन नळदुर्ग किल्ल्यावर गेल्या होत्या. किल्ल्याच्या परिसरात केक नेण्यास बंदी असल्याने त्यांनी बाहेरच केक कापल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर किल्ल्यातील छोट्या दुकानदारांकडून मुलांसाठी चॉकलेट घेण्यात आले.

या घटनेनंतर मृत मुलाच्या तोंडात चॉकलेट आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अश्विनी यांनी मुलांना बुरुजावरून फेकून स्वतःही खाली उडी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेत अश्विनी पौळ यांच्यासह दोन मुलांचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अश्विनी यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्या पती मनोहर पौळ आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि पोलिसांनी दाखल होत तपास सुरू केला आहे.

पतीच्या सांगण्यावरून नोकरीचा राजीनामा?

अश्विनी पौळ मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दल अर्थात MSF मध्ये कार्यरत होत्या. पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून त्यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मागील तीन महिन्यांपासून त्या आपल्या मुलांसह माहेरी राहत होत्या.

सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

‘महाराष्ट्राची वाघिणी’ अशी होती ओळख

अश्विनी पौळ (मोहिते) या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित महिला कुस्तीपटू होत्या. क्रीडा क्षेत्रात त्यांची ओळख ‘महाराष्ट्राची वाघिणी’ अशी होती. त्यांच्या कुटुंबालाही कुस्तीची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील, आई, भाऊ आणि बहीण हे सर्व कुस्तीशी जोडलेले आहेत. त्यांचे पती मनोहर पौळ हेदेखील कुस्तीपटू आहेत.

वडिलांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलीच्या सरावासाठी घरातच कुस्तीची तालीम उभारली होती. याच वातावरणातून अश्विनी यांनी कुस्तीच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी

2007 मध्ये तिरुवनंतपुरम, केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अश्विनी पौळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर 2008 मध्ये गुरुदासपूर, पंजाब आणि 2009 मध्ये चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी सुवर्णपदक पटकावले.

2010 मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा तसेच बालेवाडी, पुणे, कन्याकुमारी आणि सैफई, लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या कुस्ती कारकिर्दीत अश्विनी पौळ यांनी एकूण 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदके मिळवली होती.

कुस्तीच्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अश्विनी पौळ यांच्या दुर्दैवी मृत्यूने क्रीडा क्षेत्रासह त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, नळदुर्ग किल्ल्यावरील या घटनेमागील नेमके कारण आणि कौटुंबिक परिस्थितीबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

दृश्यम’ स्टाईलने वडिलांच्या हत्येचा कट; एका फोन कॉलने मुलगा पोलिसांच्या जाळ्यात, २००० किमी दूर सूरतमधून अटक

समस्तीपूरमध्ये वडिलांच्या हत्येनंतर ‘दृश्यम’ स्टाईलने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकर सहनीला सूरतमधून अटक.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026