राष्ट्रीय महामार्ग अपघात

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

National Highway Accident: रंगा फाटा–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड–हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडकेत मृत्यू झाला.

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

National Highway Accident

डोंगरकडा (National Highway Accident) : वारंगा फाटा–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड–हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. हा (National Highway Accident) भीषण अपघात सोमवारी  १७ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला. व्यंकटी माधवराव गंगातीर  (४५) राहणार मुगट जी. नांदेड असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे. 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार वारंगा फाटा कडून नांदेडच्या दिशेने कार (क्र. एमएच ४९ बीबी ०७६०) व दुचाकी (क्र. एमएच २६ सीटी ६६६३) जात होती.दुचाकीवर व्यंकटी गंगातीर मावस बहीण व त्यांचा लहान मुलगा प्रवास करीत होते. यावेळी कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. (National Highway Accident) धडकेमुळे दुचाकी सुमारे २० फूट अंतरावर फेकली गेली. या अपघातात दुचाकीस्वार व्यंकटी गंगातीर यांचा मृत्यू झाला.स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार,कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने दुचाकीला धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की,कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात  दोन ते तीन पलट्या खात सुमारे २० फूट अंतरावर जाऊन पडली.

कारमध्ये चार प्रवासी होते. प्रशांत तिडके (वय ४५), ईशा प्रशांत तिडके (वय ४०) आणि आरोह प्रशांत तिडके (वय १४) हे गंभीर जखमी झाले असून अन्य एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. (National Highway Accident) अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमींना उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची सुनेत्रा पवारांसमोर व्यथा; कर्जमाफी आणि मदतीचे आश्वासन

नांदेडच्या सोनखेडमध्ये दुष्काळी पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी पंचनामे, मदत, पाणी, चारा आणि कर्जमाफीबाबत आश्वासन दिले.

Sep 26, 2026