Nashamukt Yuva

‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ जळगाव जिल्ह्यात जनआंदोलन म्हणून राबवा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, ही शक्ती नशेपासून दूर ठेवून शिक्षण, क्रीडा, कौशल्य, रोजगार, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याकडे वळविणे आवश्यक आहे.

‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ जळगाव जिल्ह्यात जनआंदोलन म्हणून राबवा : केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

संत-महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस, शैक्षणिक संस्था, सामाजिक व सेवाभावी संघटनांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन

जळगाव : युवा शक्ती ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, ही शक्ती नशेपासून दूर ठेवून शिक्षण, क्रीडा, कौशल्य, रोजगार, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याकडे वळविणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ हे केवळ शासकीय अभियान न राहता व्यापक जनआंदोलनाच्या स्वरूपात राबविण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभियानाची उद्दिष्टे स्पष्ट करताना समाजातील प्रत्येक घटकाने नशामुक्त समाजनिर्मितीसाठी सक्रिय सहभाग घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

१०० आठवड्यांचे राष्ट्रव्यापी जनआंदोलन

‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान’ हे १०० आठवडे चालणारे राष्ट्रव्यापी जनआंदोलन आहे. युवकांना नशेच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवणे आणि सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ चे स्वप्न साकार करण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी, सक्षम आणि सशक्त पिढी घडविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या माध्यमातून देशभरातील युवकांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक उपक्रम तसेच राष्ट्रनिर्मितीच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जनजागृतीसोबत कुटुंब आणि समाजाचा सहभाग महत्त्वाचा

नशेचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नसल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यासाठी जनजागृती, समुपदेशन, कुटुंबाचा सहभाग, शैक्षणिक संस्थांची भूमिका आणि समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि सकारात्मक सामाजिक उपक्रमांशी जोडण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रत्येक गाव, कुटुंब आणि युवकापर्यंत नशामुक्तीचा संदेश

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक युवकापर्यंत नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. नशामुक्त समाज उभारण्यासाठी संत-महंत, धार्मिक संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस विभाग, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनातून सुरू झालेल्या या राष्ट्रव्यापी अभियानाला जळगाव जिल्ह्यात व्यापक जनसहभागातून बळ देण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. युवकांना व्यसनमुक्त, निरोगी, सक्षम आणि राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, आमदार श्री. सुरेश (राजूमामा) भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह संत-महंत, लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, सेवाभावी संस्था, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

नशामुक्त युवा हीच विकसित भारताची खरी ताकद आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या युवा पिढीला नशामुक्त, शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी आणि सक्षम बनविणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026