National Lok Adalat

राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा आपसी तडजोडीतून निपटारा

मानोरा येथील राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हसणी येथील दिवाणी वादासह अनेक प्रकरणांचा आपसी तडजोडीतून निपटारा करण्यात आला.

राष्ट्रीय लोक अदालतीत २० वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा आपसी तडजोडीतून निपटारा

मानोरा दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन; वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या मागणीसाठी विधीज्ञ मंडळाचे निवेदन

मानोरा : तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांना आपसी तडजोडीतून मार्ग मिळाला. मानोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात १२ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही लोक अदालत पार पडली. यावेळी मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हसणी येथील जुन्या दिवाणी न्यायालयाच्या वादाचे आपसी तडजोडीतून निराकरण करण्यात आले. यासोबतच अन्य अनेक प्रलंबित प्रकरणेही परस्पर तडजोडीने निकाली काढण्यात आली.

कार्यक्रमाला वाशिम जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुब्रमण्यम, मानोरा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. कोरेगावकर तसेच मंगरुळपीर येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तारे उपस्थित होते.

दरम्यान, मानोरा विधीज्ञ मंडळाच्या वतीने न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांना वरिष्ठ स्तर तसेच अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

यावेळी विधीज्ञ मंडळाचे ॲड. प्रवीण चौधरी, ॲड. रामप्रसाद ठाकरे, ॲड. राजेश मांडवगडे, ॲड. घनश्याम राठोड, ॲड. महेश इंगोले, ॲड. कु. पूजा अग्रवाल, ॲड. ऋषिकेश पाटील, ॲड. तहसीन पटेल, ॲड. धनराज चव्हाण यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

सरकारी फाईल ७ दिवसांपेक्षा जास्त अडकली तर कारवाई; राज्य सरकारचे कडक निर्देश

सरकारी फाईल ७ दिवसांपेक्षा जास्त अडकली तर कारवाई; राज्य सरकारचे कडक निर्देश

सरकारी फाईल सात दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित ठेवल्यास कारवाई होणार. एकाच विभागातील फाईल ४५ दिवसांत, तर अन्य विभागाशी संबंधित फाईल ३ महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश.

Sep 16, 2026
हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोली लोकअदालतीत १३ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांची प्रकरणे निकाली

हिंगोलीतील राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीआधारे १३ कोटी ३४ लाख ९१ हजार ८८२ रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६७८ प्रकरणांचा निपटारा झाला.

Sep 13, 2026
न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मोठी बातमी; निवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असताना न्यायव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Sep 05, 2026
नागपुरातील कर्णकर्कश सायलेन्सरवर हायकोर्ट संतापले; दंड नव्हे, आता ठोस कारवाईचे निर्देश

नागपुरातील कर्णकर्कश सायलेन्सरवर हायकोर्ट संतापले; दंड नव्हे, आता ठोस कारवाईचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Aug 26, 2026
वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

वर्षभरात तब्बल 683 लाचखोर अडकले `एसीबी`च्या जाळ्यात

Bribery ACB Action: र्षभरात लाचखोरीबाबत ४७५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यात ६८३ लाचखोर अडकले आहेत. यात ५१ `क्लास वन` तसेच ८५ `क्लास टू` अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Aug 25, 2026