नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला ४ लाखांचे अनुदान

तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला ४ लाखांचे अनुदान

Natural Disaster Relief

सेनगाव तहसीलदारांचा आदेश; शासनाकडून सानुग्रह मदत मंजूर

सेनगाव (Natural Disaster Relief) : तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी जारी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकरी जगन्नाथ सिताराम कोटकर हे शेतात नांगरणीचे काम करीत असताना अचानक वीज कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपातील असल्याने शासनाच्या नियमांनुसार त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी त्यांच्या अधिकारांचा वापर करून मृत शेतकऱ्यांच्या पत्नी श्रीमती मिराबाई जगन्नाथ कोटकर यांना ४ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

सदर अनुदान ‘नैसर्गिक आपत्ती निवारण’ या लेखाशिर्षांतर्गत वितरित करण्यात येणार आहे. या आर्थिक मदतीमुळे दुःखद प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या कुटुंबाला दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या आदेशाची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी हिंगोली तसेच उपकोषागार अधिकारी, सेनगाव यांना पाठविण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद, केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.3 आणि 4.5 रिश्टर स्केलची नोंद. नांदेडमध्ये जीवित व वित्तहानी नाही.

Oct 03, 2026
हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत दोन भूकंपाचे धक्के; वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथमध्ये सर्वाधिक धक्के

हिंगोलीत २४ तासांत ४.५ आणि ३.३ तीव्रतेचे दोन भूकंपाचे धक्के; वारंवारच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Oct 03, 2026
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवारांनी हेक्टरी एक लाख मदत आणि कर्जमाफीची मागणी करत सरकारवर टीका केली.

Sep 26, 2026