NCMC Card

महिलांसाठी जुनी सवलतच बरी; ग्रामीण महिलांसाठी NCMC कार्ड ठरतेय डोकेदुखी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांसाठी जुनी सवलतच बरी; ग्रामीण महिलांसाठी NCMC कार्ड ठरतेय डोकेदुखी

NCMC Card

१ सप्टेंबरपासून सवलतीच्या तिकीटासाठी NCMC कार्ड अनिवार्य; कार्ड काढणे, रिचार्ज आणि तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण महिला प्रवाशांमध्ये नाराजी

कोरची : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून सवलतीच्या तिकिटांचा व्यवहार NCMC कार्डच्या माध्यमातून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला प्रवाशांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी साध्या पद्धतीने तिकीट उपलब्ध होत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच दुर्गम गावांमधून तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना कोणत्याही अतिरिक्त प्रक्रियेला सामोरे जावे लागत नव्हते. आता मात्र NCMC कार्ड काढणे, ते कायम सोबत ठेवणे आणि प्रवासावेळी त्याचा वापर करणे ही अतिरिक्त जबाबदारी महिला प्रवाशांवर आली आहे.

ग्रामीण भागातील अनेक महिलांना डिजिटल व्यवहार, कार्ड रिचार्ज तसेच कार्डशी संबंधित तांत्रिक बाबींची पुरेशी माहिती नसते. बसस्थानकांपासून लांब असलेल्या गावांतील महिलांना NCMC कार्ड मिळवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रवास करावा लागू शकतो. त्यातच कार्ड हरवल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास सवलतीचा लाभ घेण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.

‘सवलत देण्याचा निर्णय स्वागतार्ह, मात्र प्रक्रिया सुलभ हवी’

महिलांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ही सवलत मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी आणि ग्रामीण भागातील महिलांना सहज उपलब्ध होईल, अशी असावी, अशी भूमिका महिला प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने NCMC कार्डची सक्ती करण्याऐवजी पूर्वीप्रमाणेच सुलभ पद्धतीने सवलतीचा लाभ देण्याची मागणी होत आहे. तसेच NCMC कार्डची सुविधा कायम ठेवायची असल्यास गावपातळीवरच कार्ड उपलब्ध करून देणे आणि आवश्यक सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे महिला प्रवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान, गडचिरोली आगार व्यवस्थापकांच्या आदेशानुसार NCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट वितरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असताना महिला प्रवाशांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

संबंधित सामग्री

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून ST सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार. महिला व ज्येष्ठ नागरिकांना QR पावती, BHIM App आणि OTPची सुविधाही मिळणार.

Sep 29, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी बससेवा सुरू

बुलढाणा–काशी पोहरादेवी मुक्काम एसटी बससेवा २५ सप्टेंबरपासून सुरू; भाविकांना दिलासा. पोहरादेवीत एसटी डेपो उभारण्याची मागणी.

Sep 26, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026