Paddy Crop

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

Paddy Crop

कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे नायब तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याची मागणी

कोरची : पावसातील खंड, असमान पर्जन्यमान आणि प्रतिकूल हवामानामुळे कोरची तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, त्यातच धान पिकावर विविध रोग व किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन कोरचीचे नायब तहसीलदार गणेश सोनवनी यांच्याकडे सादर करण्यात आले. तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण असमान राहिले असून, पावसात पडलेल्या खंडामुळे धान पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यातच सध्या खोडकिडा, तुडतुडा, करपा, भुरा माहू यांसह विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे तसेच मजुरीवर मोठा खर्च करून धानाची लागवड केली आहे. मात्र प्रतिकूल हवामान आणि रोगराईमुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेस कमिटीने तालुक्यातील धान पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष पीक नुकसानीचे सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच कोरची तालुक्यातील परिस्थितीचा विचार करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच धान पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, आवश्यक औषधांची मोफत उपलब्धता करून द्यावी आणि फवारणीसाठी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, तसेच २०२५-२६ चा धान बोनस लवकरात लवकर अदा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाबाबत तसेच वीज बिलाबाबत शासनाने सवलत द्यावी आणि भविष्यात अशा नैसर्गिक संकटांच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कोरची तालुक्यासाठी विशेष कृषी मदत कक्ष सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, सध्याच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरपंचायत नगरसेवक मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसूराम कारेंगे, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष वसीम शेख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सुशील साखरे, प्रकाश सहारे, आशिष होळी, राजकुमार तुलावी आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेडमध्ये प्रशासन अलर्ट! सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन २ ते ४ ऑक्टोबरच्या सरकारी सुट्टीतही अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Oct 01, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026