हिंगोली (Hingoli Women's Hospital) : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शासकीय महिला रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असलेली ही भव्य दिव्य इमारत सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असून केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील महिलांना एकाच छताखाली प्रसूती, स्त्रीरोग, नवजात शिशू काळजी व इतर विशेष उपचार मिळावेत या उद्देशाने या स्वतंत्र महिला रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जुने ग्रामीण रुग्णालय मोडकळीस आल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे शासनाने याच जागेवर नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. सदर इमारत तीन मजली असून त्यामध्ये प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, तपासणी केंद्र, औषध भांडार व रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयाच्या परिसरात प्रशस्त पार्किंग, रुग्ण नातेवाईकांसाठी प्रतिक्षा कक्ष व हरित क्षेत्राचीही तरतूद आहे.
या सुसज्ज (Hingoli Women's Hospital) इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. आधुनिक स्थापत्यशैली, आकर्षक रंगसंगती व रात्रीच्या वेळी करण्यात आलेली विद्युत रोषणाई यामुळे ही वास्तू शहरातील एक महत्त्वाचे लँडमार्क ठरत आहे. नागरिकांमध्येही या रुग्णालयाबाबत समाधान व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट व वैद्यकीय उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मंत्रिमहोदयांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर हिंगोलीसह शेजारील ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयामुळे माता व बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महिलांचे शासकीय रूग्णालय सज्ज: इमारत ठरतेय शहराचे नवे आकर्षण
Hingoli Women's Hospital: हिंगोलीत एक किमान कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेले नवी शासकीय महिला रुग्णालय, जे जुने ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर बांधले गेले आहे.
Hingoli Women's Hospital
संबंधित सामग्री
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग
Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार
Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..