Nilanga Fire

निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग; तळमजल्यावरील दुकान जळून खाक

निलंग्यात तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. तळमजल्यावरील दुकान जळून खाक झाले, तर पतसंस्थेच्या कार्यालयातील कागदपत्रांचेही मोठे नुकसान झाले.

निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग; तळमजल्यावरील दुकान जळून खाक

मध्यरात्री दीड वाजता थरार; पतसंस्थेच्या कार्यालयातील कागदपत्रांचेही मोठे नुकसान

निलंगा : शहरातील लातूर-बिदर रोडवरील अटल वॉकच्या शेजारी असलेल्या तीन मजली इमारतीला गुरुवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत तळमजल्यावरील कॉलिटी इंटरप्राईजेस हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. दुकानात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इंजिनिअरिंग साहित्याचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

आगीची तीव्रता एवढी होती की तिची झळ इमारतीच्या वरील दोन मजल्यांवर असलेल्या बंधन पतसंस्थेच्या कार्यालयालाही बसली. कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे २.१५ वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे व सौरभ नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले; मात्र वाहनातील पाणी संपल्याने पुन्हा पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यामुळे काही काळ आग अधिकच भडकली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली.

यानंतर पोलीस यंत्रणा, नगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बराच वेळ सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजताच दुकानमालक पी. डी. पवार यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या आगीत दुकानातील साहित्य तसेच पतसंस्थेच्या कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याबाबत तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026
महाड MIDC हादरलं! सिनर्जिया केमिकल कंपनीत भीषण स्फोट; चार जण जखमी, 4-5 किमीपर्यंत जाणवले हादरे

महाड MIDC हादरलं! सिनर्जिया केमिकल कंपनीत भीषण स्फोट; चार जण जखमी, 4-5 किमीपर्यंत जाणवले हादरे

महाड MIDC मधील सिनर्जिया केमिकल कंपनीत मोठा स्फोट; चार जण जखमी. 4-5 किमीपर्यंत हादरे, दोन तासांत परिस्थिती नियंत्रणात.

Sep 28, 2026
लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उपाययोजनांना सुरुवात झाल्याचे सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीडचा डीपीआर डिसेंबरपर्यंत अपेक्षित.

Sep 23, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई झाली आहे. १० वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा असून, निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील म्हणाले.

Sep 19, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026