महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nomination Filing

वर्धा (Nomination Filing) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्याचा दृढ विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष शिवा राव, विनायक बांगडे, सुभाष गौर, शेखर शेंडे, प्रविण हिवरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीत एकजुटीने लढत देण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ वाढविण्याचे आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे निवडणूक वातावरणाला अधिक रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संबंधित सामग्री

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल, ‘सरसकट मदत कुठे?’

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवारांनी हेक्टरी एक लाख मदत आणि कर्जमाफीची मागणी करत सरकारवर टीका केली.

Sep 26, 2026
डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026