Maharashtra Legislative Council Election 2026

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

Maharashtra Legislative Council Election 2026

अमरावती, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर विभागातील शिक्षक-पदवीधर मतदारसंघ; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच विधानपरिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अमरावती, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या विभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ६ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर २०२६ मध्ये अमरावती व पुणे शिक्षक तसेच नागपूर, पुणे आणि औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

या निवडणुकांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

अमरावती, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या ठिकाणी शिक्षक व पदवीधर मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार असल्याने इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू झाली आहे. या मतदारसंघांसाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. अधिकृत माहितीनुसार १ नोव्हेंबर २०२५ हा पात्रता दिनांक धरून संबंधित मतदारसंघांच्या मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या निवडणुका महायुतीच्या घटक पक्षांकडून एकत्रितपणे लढवल्या जाणार की स्वतंत्रपणे, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील एका घटक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे या पार्श्वभूमीवर सांगितले जात आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी, मतदारसंघनिहाय रणनीती आणि निवडणूक तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026