रिसोडचे सुपुत्र डॉ. अनिल देशमुख यांचा बुलढाणा अर्बन परिवारातर्फे भव्य सत्कार

रिसोडच्या मातीतील व्यक्तिमत्व राज्याचे मंत्री नामदार श्री. जयस्वालजी यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) डॉ. श्री. अनिल केशवरावजी देशमुख यांचा बुलढाणा अर्बन, रिसोड शाखा येथे सत्कार करण्यात आला.

रिसोडचे सुपुत्र डॉ. अनिल देशमुख यांचा बुलढाणा अर्बन परिवारातर्फे भव्य सत्कार

OSD Appointment

मंत्रालयातील ओएसडी पदी नियुक्तीबद्दल व्यापारी महासंघ व मान्यवरांकडून कौतुक

रिसोड (OSD Appointment) : रिसोडच्या मातीतील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आणि राज्याचे मंत्री नामदार श्री. जयस्वालजी यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) डॉ. श्री. अनिल केशवरावजी देशमुख यांचा आज बुलढाणा अर्बन, रिसोड शाखा येथे स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला. मंत्रालयातील महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच रिसोडमध्ये आगमन झाल्याने, या भूमिपुत्राचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. मदनसेठ बगडियाजी तसेच बुलढाणा अर्बनचे संचालक व व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष श्री. नंदकिशोरजी झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. अनिल देशमुख यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आपल्या शहरात आणि आपल्या लोकांमध्ये होणारा सत्कार हा ऊर्जेचा स्रोत असतो. मंत्रालयातील पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास माझे नेहमीच प्राधान्य असेल.”

यावेळी श्री. मदनसेठ बगडियाजी आणि श्री. नंदकिशोरजी झंवर यांनी डॉ. देशमुख यांच्या कार्याचे कौतुक करत, एका स्थानिक सुपुत्राने मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने स्थान निर्माण करणे ही संपूर्ण रिसोड शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले.

या सोहळ्याला बुलढाणा अर्बनचे पदाधिकारी, व्यापारी महासंघाचे सदस्य, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच डॉ. अनिल देशमुख यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने करण्यात आले.

संबंधित सामग्री

रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

रिसोड शहर आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे व गाई ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.

Aug 08, 2026
MPSC परीक्षेत रिसोडच्या गौरी जोशी यांचे घवघवीत यश; ‘उद्योग निरीक्षक’ पदाचा कार्यभार स्वीकारला

MPSC परीक्षेत रिसोडच्या गौरी जोशी यांचे घवघवीत यश; ‘उद्योग निरीक्षक’ पदाचा कार्यभार स्वीकारला

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत रिसोड येथील कु. गौरी अमोल जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Jun 13, 2026
सरकारी रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला

सरकारी रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला

 रिसोड शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगाळा परिसरातील शेतशिवारात सरकारी रस्त्याच्या वादातून दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

May 25, 2026
कागदी कपातील चहा देतोय कर्करोगाला निमंत्रण; ‘जागतिक चहा दिनी’ रिसोडमध्ये पर्यावरण प्रेमींचा इशारा!

कागदी कपातील चहा देतोय कर्करोगाला निमंत्रण; ‘जागतिक चहा दिनी’ रिसोडमध्ये पर्यावरण प्रेमींचा इशारा!

आजच्या आधुनिक युगातील लोकांनी मान्य केलेले महत्त्वाचे पेय म्हणजे चहा होय.

May 23, 2026
रिसोड तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रिसोड तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

तालुक्यातील मांडवा येथील अल्पभूधारक शेतकरी रोहीदास वामन जाधव (वय 65) यांनी आज सकाळी राहत्या घरातील टिनपत्राखालील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

May 18, 2026