गोदापात्र तरुण मृत्यू

परभणीत अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू

Deserving youth Death: परभणीत दोन घटना: एका तरुणाने गोदावरी नदीपात्रात उतरलेल्या व दुसऱ्याने किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. पालम तालुक्यातील अंघोळीसाठी उतरलेला तरुण पाण्यात बुडला

परभणीत अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू

Deserving youth Death

 

पालम तालुक्यातील फळा येथील घटना..

परभणी (Deserving youth Death) : पालम तालुक्यात अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटना पालम तालुक्यातील फळा येथे २४ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पालम पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुण हा फळा येथे देवदर्शनासाठी आला होता.

नागोराव परसराम तावडे यांनी खबर दिली आहे. शामसुंदर परसराम तावडे वय २८ वर्ष, असे मयताचे नाव आहे. सदर तरुण हा नांदेड जिल्ह्यातून फळा येथे देवदर्शनासाठी आला होता. गोदावरी नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला असता पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरुन खोल पाण्यात बुडाला त्यातच तरुणाचा मृत्यू झाला. पालम पोलिसात अकस्मा मृत्युची नोंद (Deserving youth Death) करण्यात आली आहे. तपास पोह. कांगणे करत आहेत.

किडनीच्या आजाराने महिलेचा मृत्यू
परभणी : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी २४ मे रोजी बोरी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विलास वैरागड यांनी खबर दिली आहे. पूजा वैरागड वय ३० वर्ष, असे मयत महिलेचे नाव आहे. तपास पोह. कोकाटे करत आहेत.

संबंधित सामग्री

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

माेठा निर्णय! गाय, बैल, म्हशीच्या वीज अपघाती मृत्यूला मिळणार 50 हजार रुपये

Livestock Electric Accidental Death: महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई

Oct 05, 2026
एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

एसटी बसची दुचाकीला जोरदार धडकेत वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु

ST Bus Accidental Death: कांद्री परिसरातील नागपुर-जबलपुर महा मार्गावर पेट्रोल पंपासमोर एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना

Sep 20, 2026
पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

पावसाचा मोठा खंड पडल्याने आर्थिक विवंचनेतून उजनी येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याची गोठ्यात गळफास लावून आत्महत्या

उजनी येथील ४६ वर्षीय शेतकरी श्रीमंत बिभीषण वळके यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने ही घटना घडली.

Sep 13, 2026
अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

अपघातात चौघांचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

Hingoli Accidental Death: वसमत तालुक्यातील कळंबा पाटीजवळ  सोमवारी दुपारच्या  सुमारास झालेल्या  ऑटोच्या भिषण अपघातात चौघांचा  मृत्यू झाला  असून पाचजण गंभीर  जखमी

Sep 07, 2026
श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

इंडिगोच्या विमानांशी संबंधित दोन घटना सलग दोन दिवस समोर आल्या आहेत.

Sep 04, 2026