गंगाखेड तरुण मृत्यू

परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

Gangakhed Youth Death: गंगाखेड येथे उंदीर मारायचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही (Gangakhed Youth Death) घटना सोमवार सकाळी घडली.

परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

Gangakhed Youth Death

 

परभणीतील गंगाखेडमधील खडकपुरा येथील घटना, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद...!

परभणी (Gangakhed Youth Death) : गंगाखेड येथे उंदीर मारायचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही (Gangakhed Youth Death) घटना सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, माहेरी गेलेली पत्नी दोन वर्षांपासून नांदायला येत नसल्याच्या तणावात असलेल्या बालाजी दत्तराव बोरगड वय २७ वर्ष रा. खडकपुरा, गंगाखेड या तरुणाने रविवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास उंदीर मारायचे औषध प्राशन केल्याने त्यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यास परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता उपचार सुरु असतांना सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यु झाल्याची खबर मयत तरुणाचा भाऊ नागनाथ दत्तराव बोरगड वय ४२ वर्ष रा. खडकपुरा याने दिल्यावरून (Gangakhed Youth Death) गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोह मारोती माहोरे, पोशि गोविंद कदम हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमान खांबाला धडकले; प्रवासी सुखरूप, विमान वाहतूक सुरळीत

इंडिगोच्या विमानांशी संबंधित दोन घटना सलग दोन दिवस समोर आल्या आहेत.

Sep 04, 2026
हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

हिंगोलीतील एकुलत्या एक मुलाचा सिरसम येथील अपघातात दुर्दैवी मृत्यू

Sirsam Accidental Death: शहरातील वंजारवाडा पोळा मारोती भागातील २२ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मंगळवारी दुपारच्या सुमारास सिरसम जवळील अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शोककळा पसरली

Sep 01, 2026
छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

Bangladesh Hindu Family Death: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक

Aug 24, 2026
दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथील घटना

दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार; चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथील घटना

Sexual assault case: चिखली तालुक्यातील बोरगाव वसु येथे २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.

Aug 06, 2026
आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

आतंकवादी फिरत असल्याचे सांगून सोन्याची अंगठी व मोबाईल पळविला

Hingoli Rural Police: समोर आतंकवादी फिरत  असल्याचे  सांगून त्यांच्या  जवळील सोन्याची अंगठी  काढण्यास सांगून रुमालामध्ये ठेवल्याचे भासून सोळंके यांच्या गाडीच्या डिक्कित ठेवून निघून गेले.

Aug 04, 2026