विधान परिषद निवडणूक

विधान परिषद निवडणूक: उमेदवारीसाठी होणार मोठी रस्सीखेच

Legislative Council Elections: परभणी हिंगोली मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय लढा मोठ्या प्रमाणात आहे.

विधान परिषद निवडणूक: उमेदवारीसाठी होणार मोठी रस्सीखेच

Legislative Council Elections

 

हिंगोली - परभणी विधान परीषद पक्षीय बलाबल

हिंगोली (Legislative Council Elections) : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होताच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे उमेदवारीसाठी पक्ष पातळीवर मोठी रस्सीखेच होईल असा अंदाज आहे. 
   
मोठ्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांना संधी मिळाली होती. काँग्रेसचे सुरेश देशमुख पराभूत झाले खरे पण त्यांनी मते चांगली मिळविली होती. यंदाच्या निवडणुकीत सरळ सरळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास युतीच्या विजयाचा मार्ग मोकळा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्याने यावेळी केवळ ४६८ मतदार आहेत. त्यात युतीकडे ३०७ मतदार असून आघाडीकडे केवळ ११९ मतदार आहेत.

या जागेसाठी मोठी चुरस महायुती अंतर्गत पहावयास मिळणार आहे. ही जागा पूर्वीच्या युतीमध्ये शिवसेनेकडे होती. त्यानुसार पुन्हा शिवसेनेलाच संधी मिळावी अशी शिंदेंच्या शिवसेनेची मागणी असेल. मागील वेळी युतीमध्ये दावा सोडणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची संख्या यंदा शिवसेनेपेक्षा अधिक आहे. शिवसेनेकडे ७७ मतदार असून भारतीय जनता पक्षाकडे ९९ मतदार आहेत. मतदार संख्येनुसार युतीमध्ये शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर आहे व भारतीय जनता पक्ष दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे मतदार संख्येचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे १३१ मतदार आहेत. यामुळे शिवसेनेला युतीमध्ये जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
   
एकंदरीत मतदार संख्येचा विचार केला असता एकूण ४६५ पैकी ३३५ मतदार परभणी जिल्ह्यात असल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा दावा तसा कमकुवत आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण १३० मतदार आहेत हिंगोलीतून शिवसेनेत उमेदवारी मागण्या मागणार्‍यांची यादी मोठी आहे. पक्ष पातळीवर होणार्‍या वाटाघाटीत ही जागा जर भारतीय जनता पक्षाला मिळाली तर उमेदवार परभणी जिल्ह्यातून येण्याची चिन्हे आहेत, कारण भारतीय जनता पक्षाने हिंगोली जिल्ह्याला एक अतिरिक्त राज्यसभेचा खासदार व एक विधान परिषदेचा आमदार दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक सदस्य संख्या असली तरी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षा फार वाढलेली आहे.

नैसर्गिक नियम डावलून शिवसेनेकडून ही जागा कोणाला द्यायची असेल तर अपक्षांसहित इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन सदस्य संख्या वाढविण्याची कसब भारतीय जनता पक्षाकडेच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे ४६८ पैकी केवळ १०२ मतदार असल्याने फारसे इच्छुक आघाडीकडे आज तरी दिसत नाहीत. आघाडीच्या उमेदवाराला जिंकण्या साठी आघाडीची सगळी मते घेऊन अपक्ष व इतर पक्षांना तर घ्यावेच लागेल शिवाय महायुतीचे मतदारही फोडावे लागतील. एकंदरीत हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी सत्ताधारी पक्षांतच मोठी रस्सीखेच पहावयास मिळणार आहे हे निश्चित.

अपक्ष उमेदवार वाढवू शकते चुरस

विधान परिषदेच्या यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढण्याची तर शक्यता आहेच किंबहुना एखादा उमेदवार मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक मजबूत मैदानात उतरू शकतो. महायुती व महाविकास आघाडी कडून प्रत्येकी एक उमेदवार येईल हे तर नक्कीच आहे. दोन्ही बाजूने तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार्‍यांमुळे ही निवडणूक चुरशीची होईल. उमेदवारांची संख्या वाढल्यास फार कमी मतदार सोबत घेऊन विजय मिळविणे सोपे असल्याने यावेळी मतदारांची मोठी चांदी होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव बदलणार? ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग; भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

पश्चिम बंगालचं नाव ‘पश्चिम बंग’ करण्याच्या हालचालींना वेग? भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी विधानसभेत विधेयक मांडण्याचे संकेत दिले.

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026