परभणी मनपा कर्मचारी

परभणीत फरकाच्या थकित वेतनासाठी मनपा कर्मचारी आक्रमक

Parbhani Municipal Employee: मनपाच्या कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे मागील पाच महिन्यापासून वेतन थकले आहे. वेतनासाठी वाढीव जीएसटी अनुदान द्यावे, फरकाची थकित रक्कम तात्काळ देण्यात यावी

परभणीत फरकाच्या थकित वेतनासाठी मनपा कर्मचारी आक्रमक

Parbhani Municipal Employee

 

वेतनासाठी वाढीव जीएसटी अनुदानाची मागणी; शाखा अभियंता यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी

परभणी (Parbhani Municipal Employee) : मनपाच्या कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे मागील पाच महिन्यापासून वेतन थकले आहे. वेतनासाठी वाढीव जीएसटी अनुदान द्यावे, फरकाची थकित रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी करत सोमवार १० ऑगस्ट रोजी कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलन केले. कार्यालय परिसरात प्रचंड घोषणाबाजी करत कर्मचार्‍यांनी रोष व्यक्त केला.

गेल्या पाच, सहा महिन्यापासून मनपा कर्मचार्‍यांचे वेतन थकले आहे. नियमित वेतनासाठी महाराष्ट्र राज्य नगर पालिका,  नगर पंचायत संवर्ग अधिकारी, कर्मचारी संघटनेने सतत शासन दरबारी प्रश्न मांडला. (Parbhani Municipal Employee) परभणी मनपाला जीएसटी अनुदान कमी येत असल्याने वेतन अदा करण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे केले जाते. संघटनेने वाढीव अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूरीसाठी शासनाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी समिती गठीत केली. मात्र अद्यापही वाढीव जीएसटी अनुदानाचा प्रश्न सोडवला नाही.

शिवाय फरकाची रक्कमही दिली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार पाठपुरावा करुनही वाढीव जीएसटी अनुदानात वाढ होत नाही. त्यामुळे सोमवार १० ऑगस्ट रोजी कर्मचार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. शाखा अभियंता यांच्या कार्यालयास घेराव घालून घोषणाबाजी केली. दरम्यान महापौर सय्यद इकबाल यांनी कर्मचार्‍यांशी संवाद साधून आंदोलनास पाठिंबा दिला.

या (Parbhani Municipal Employee) आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नासेर खान वहिद खान, अनुसयाबाई जोगदंड, के.के. भारसाखळे, व्ही.एस. उफाडे, विजय ठाकूर, खाजा मोईन खान, विश्वनाथ गोबाडे, अभिजीत कुलकर्णी, सिताबाई तांबे, शोभा सालगुडे, नंदाबाई सोनवणे, गुलाबबाई मदेवाड आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026