परभणी जिंतूर वाहतूक

परभणीतील जिंतूरकडे जाणारी वाहतूक पुलाच्या कामामुळे वळवली

Parbhani Jintur Transport: परभणीतील वाहतूक बदलामुळे जिंतूरकडे जाणारी वाहने २९ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी १ दरम्यान पर्यायी मार्गाने जाणार आहेत.

परभणीतील जिंतूरकडे जाणारी वाहतूक पुलाच्या कामामुळे वळवली

Parbhani Jintur Transport

२९ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी १ दरम्यान वाहतूक बंद

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

परभणी (Parbhani Jintur Transport) : शहरातील विसावा चौकीजवळील कॅनल पुलाचे बांधकाम रविवार २९ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीत करण्यात येणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ के वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी रविंद्रसिंह परदेशी यांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. 

शहरातील विसावा चौकीजवळील कॅनलवर राष्ट्रीय महामार्ग ७५२ के हा परभणी ते जिंतूर मार्ग असून या (Parbhani Jintur Transport) मार्गावर दररोज अवजड व हलकी वाहने, मोटारसायकली तसेच एस.टी. बसेसची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांचीही ये-जा मोठ्या प्रमाणावर असते. एम.एस.आर. डी.सी. लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने रविवार २९ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या वेळेत संबंधित मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे अधिसूचनेत नमुद करण्यात आले  आहे.

सदर कालावधीत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच शहर वाहतूक शाखेचे पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिक व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, वाहतूक कोंडी टाळावी व शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी  यांनी केले आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग
जिंतूरकडून परभणीकडे येणारी वाहने: सर्व वाहने बायपास पुलावरून उजवीकडे वळून बायपास रोडमार्गे (Parbhani Jintur Transport) पेडगाव रोडने परभणीत प्रवेश करतील. धार रोड व वांगी रोडकडे जाणार्‍या वाहनांना बायपास पुलावरून डावीकडे वळून बायपास रोडमार्गे धार रोड कॅनलजवळून संबंधित मार्गावर प्रवेश दिला जाईल. परभणीकडून जिंतूरकडे जाणारी वाहने : विसावा चौकी येथून पाथरी रोडमार्गे नवीन बायपास रोडने वाहने जिंतूरकडे जातील.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026