पारडा दुहेरी खून प्रकरण

पारडा येथील दुहेरी खून प्रकरणाला फुटली वाचा; तिघे जेरबंद

Parda Murder Case: पारड्यातील शेतशिवारातील आखाड्यावर राहणाऱ्या वृद्ध पती-पत्नींना धारदारी हत्या केली गेली. आरोपी त्रयानेची अटक करण्यात आली आणि त्यांनी गुन्ह्याचा स्विकार केला.

पारडा येथील दुहेरी खून प्रकरणाला फुटली वाचा; तिघे जेरबंद

Parda Murder Case


करणीच्या संशयातून हत्या केल्याची आरोपींनी दिली कबुली
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

हिंगोली (Parda Murder Case) : तालुक्यातील पारडा शेत शिवारातील आखाड्यावर राहणार्‍या वृद्ध पती-पत्नीची करणी करत असल्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली आहे. राहुल सम्राट खंदारे, अक्षय घनश्याम वाघमारे आणि राजु गौतम वाघमारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

२९ जून रोजी अनिल बळीराम वाघमारे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांचे आई-वडील बळीराम देवबा वाघमारे व कलावती बळीराम वाघमारे हे पारडा शिवारातील आखाड्यावर असताना अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला करून त्यांचा खून केला. या (Parda Murder Case) प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक  लोढा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. मोहन भोसले व सपोनि व्ही.एस. अरसेवार यांच्या विशेष पथकाला तपासाचे आदेश दिले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी  ३ जुलै  रोजी इसापुर येथील राहुल खंदारे (वय ३२), पारडा येथील अक्षय वाघमारे (वय ३०) आणि राजु वाघमारे (वय ३३) यांना ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

मुख्य आरोपी राजु वाघमारे याची प्रकृती वारंवार बिघडत होती. मयत बळीराम व कलावती वाघमारे करणी करत असल्याने आपली तब्येत बिघडत असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून त्याने साथीदार राहुल आणि अक्षय यांना सोबत घेऊन आखाड्यावर जाऊन दोघा वृद्धांची हत्या केली. (Parda Murder Case) ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सपोनि व्ही.एस. अरसेवार, पोउपनि माधव जिव्हारे यांच्यासह पांडुरंग राठोड, गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, निरंजन नलवार, सतिश जाधव, नरेंद्र साळवे, दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे, इरफान पठाण, मारोती काकडे यांच्या पथकाने केली. गुन्हा उघड करणार्‍या पथकाचे पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित सामग्री

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने  व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार

Aug 18, 2026
परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: मानवत  तालुक्यातील रूढी शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३४ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 09, 2026
पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

पारडा येथील दांम्पत्याच्या खून प्रकरणात आरोपींना पोलीस कोठडी

Parda Murder Case: पारडा तालुक्यातील बळीराम व कलावतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींना अटक केली गेली. गुन्ह्यावरून पोलिसांनी काही मुख्य आरोपींना अटक करण्याचा निर्णय

Jul 05, 2026
गोरेगावातील झन्ना मन्ना जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल

गोरेगावातील झन्ना मन्ना जुगारावर छापा; सहा जणांवर गुन्हा दाखल

Goregaon gambling raid: गोरेगाव पोलिसांनी २१५० रुपये जप्त करून सहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल केला. यातच फक्त २१५० रुपये जप्त झाले, तर अन्य धरतीच्या काळज्यावर अवैध धंदे करणाऱ्या लोकांचा संशोधन करत आहे.

Jun 28, 2026