परभणी व्यक्ती मृतदेह

परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: मानवत  तालुक्यातील रूढी शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३४ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

परभणीत रुढी शिवारातील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body

 

परिसरात खळबळ; ओळख पटविण्याचे मानवत पोलिसांसमोर आव्हान

परभणी (Parbhani Dead body) : मानवत  तालुक्यातील रूढी शिवारातील एका विहिरीत अंदाजे ३४ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी विहिरीत व्यक्ती बुडत असल्याचे शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधारामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाल्याने रविवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

रूढी येथील गट क्रमांक १९२ मध्ये छत्रपती पांडुरंग होंडे यांच्या शेतातील विहिरीत शनिवार ८ ऑगस्ट रोजी   सायंकाळी सुमारे पाच वाजता एका अनोळखी व्यक्तीने विहिरीत उडी मारल्याचे शेजारील शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी पाहिले. (Parbhani Dead body) संबंधित व्यक्ती विहिरीत बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस हवालदार अतुल पंचागे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रविवार ९ ऑगस्ट रोजी  सकाळी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, पोलीस हवालदार शेख जावेद, खंडेराय राऊत तसेच ग्रामस्थांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मृत व्यक्तीच्या खिशात कोणतेही ओळखपत्र किंवा कागदपत्र आढळून आले नसल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. (Parbhani Dead body) मृतदेह ओळख पटविण्यासाठी मानवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने तणावातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याच्या कार्यात रूढीचे सरपंच मुसा कुरेशी, उपसरपंच पिंठू निर्वळ, पोलीस पाटील नारायणराव निर्वळ, विष्णू होंडे, किशन होंडे, छत्रपती होंडे, रामप्रसाद होंडे, नारायण निर्वळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले. या घटनेचा पुढील तपास मानवत पोलिसांकडून सुरू असून, अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित सामग्री

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; नांदेड आणि नंदुरबारमध्ये शोककळा

गणेश विसर्जनादरम्यान नांदेडमध्ये दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा आणि नंदुरबारमध्ये २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

Sep 21, 2026
मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी;  तिघांचा बचाव

मुंबईहून नाशिकला आलेल्या ग्रुपवर दुःखाचा डोंगर; रामकुंडात स्नानासाठी उतरलेल्या चार मुलांना जलसमाधी; तिघांचा बचाव

नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंड परिसरात गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी उतरलेल्या चार मुलांना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याची घटना घडली.

Sep 05, 2026
ब्रिटिशकालीन बंधार्‍याच्या डोहात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

ब्रिटिशकालीन बंधार्‍याच्या डोहात दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Chikhaldara student death: खटकाली गावाजवळील डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सातपुड्याच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत ही दुर्घटना घडल्याने आकोट शहरात हळहळ

Aug 24, 2026
कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने  व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह १.६० लाखांचा ऐवज लंपास

Kandri Burglary Case: पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार

Aug 18, 2026
परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

परभणीतील थुना नदीपात्रात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह

Parbhani Dead body: पूर्णा शहरालगतच्या थुना नदीच्या पात्रात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्याने फुगलेला मृतदेह १२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या पुर्वी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Aug 13, 2026