पातूर येथे संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सवाचा उत्साह

पातूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सिदाजी महाराज यांच्या १३८ व्या भव्य यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाने पातूर नगरी भक्तिमय झाली आहे.

पातूर येथे संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सवाचा उत्साह

Patur Yatra Mahotsav

आज दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन

पातूर (Patur Yatra Mahotsav) : पातूरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री सिदाजी महाराज यांच्या १३८ व्या भव्य यात्रा महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाने पातूर नगरी भक्तिमय झाली आहे. या महोत्सवाचा मुख्य सोहळा आज, शनिवार २८ मार्च २०२६ रोजी संपन्न होत असून, यानिमित्त दहीहंडी आणि भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत श्री सिदाजी महाराज संस्थान व यात्रा पंचमंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. हिंदू मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या यात्रेचा प्रारंभ झाला होता. सप्ताहादरम्यान दररोज हरिपाठ, भागवत कथा आणि हरिकीर्तनाचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ज्यामध्ये भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

आजचे विशेष कार्यक्रम : 

आज समारोपाच्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल :

 * काल्याचे कीर्तन: सकाळी ९:३० ते १०:०० या वेळेत ह.भ.प. अमोल महाराज घुगे (पास्तुल) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
 * दहीहंडी उत्सव: दुपारी १२:०० वाजता दहीहंडी फोडून उत्सवाचा आनंद साजरा केला जाईल.
 * महाप्रसाद: सायंकाळी ५:०० वाजेपासून भव्य महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.

आयोजकांनी पातूर परिसरातील सर्व भाविकांना या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित सामग्री

चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

चिखलीत महायुतीच्या भव्य दहीहंडीचा थरार; हजारो चिखलीकरांच्या उपस्थितीत उत्साहाला उधाण

Chikhli DahiHandi Festival: श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा थरार, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांची चित्तथरारक उंची, ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेच्या तालावर हजारो चिखलीकर..

Sep 06, 2026
उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरी खुर्द तीर्थक्षेत्री कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थिती लाभली.

Sep 05, 2026
विदर्भातील नंबर वन दहीहंडीचा चिखलीत होणार थरार...

विदर्भातील नंबर वन दहीहंडीचा चिखलीत होणार थरार...

Chikhli Dahihandi Festival: श्रीकृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देणारी आणि गोविंदांच्या उत्साहाने दरवर्षी चिखलीची महायुतीची दहीहंडी यंदाही भव्य स्वरूपात, विदर्भातील सर्वात मोठी आणि नंबर वन दहीहंडी...

Sep 03, 2026
गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्यास सोसायटी कारवाई करू शकते का? जाणून घ्या कायदा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उत्सवाच्या तयारीला सुरुवात होते.

Aug 26, 2026
जगन्नाथ रथयात्रेत भीषण चेंगराचेंगरी; ३ भाविकांचा मृत्यू, २०० हून अधिक जखमी

जगन्नाथ रथयात्रेत भीषण चेंगराचेंगरी; ३ भाविकांचा मृत्यू, २०० हून अधिक जखमी

ओडिशातील पुरी येथे सुरू असलेल्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गुरुवारी दुर्दैवी दुर्घटना घडली.

Jul 17, 2026