Police Sub Inspector

अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी; नागपुरात पुढील उपचारासाठी हलविले

वडसा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरस्कोल्हे (वय ५६, रा. आरमोरी) हे शनिवारी पहाटे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले.

अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी; नागपुरात पुढील उपचारासाठी हलविले

Police Sub Inspector

आरमोरी–वडसा मार्गावरील रेल्वे पुलाजवळ पहाटेची घटना

आरमोरी (Police Sub Inspector) : वडसा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरस्कोल्हे (वय ५६, रा. आरमोरी) हे शनिवारी पहाटे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले. हा अपघात आरमोरी–वडसा मार्गावरील आरमोरीपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ आज सकाळी अंदाजे ५.३० वाजताच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष मरस्कोल्हे यांनी वडसा पोलीस ठाण्यात पहाटे ५.०० वाजेपर्यंत आपली ड्युटी पूर्ण केली. त्यानंतर ते दुचाकीने आपल्या मूळगावी आरमोरीकडे निघाले होते. दरम्यान, आरमोरी–वडसा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुचाकी घसरून अपघात झाला की एखादा वन्य प्राणी अचानक समोर आल्याने किंवा दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. संबंधित यंत्रणेकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच मरस्कोल्हे यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूरमधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे पोलीस विभागासह आरमोरी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सहकारी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026