Pune Traffic Changes

दहीहंडीमुळे पुण्यात ४-५ सप्टेंबरला वाहतूक बदल; 'या' मार्गांवर जाण्यापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या

श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

दहीहंडीमुळे पुण्यात ४-५ सप्टेंबरला वाहतूक बदल; 'या' मार्गांवर जाण्यापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या

Pune Traffic Changes

फडके हौद, शिवरकर रोडसह विविध भागांत निर्बंध; गर्दीनुसार वाहतूक एकेरी किंवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय

श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक शाखेकडून आवश्यकतेनुसार मार्गांवर निर्बंध लागू केले जाणार आहेत. काही रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत वाहतुकीत बदल राहणार आहेत. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड आणि फडके हौद परिसरातील वाहनांना परिस्थितीनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी शिवरकर रोडवरील वाहतूकही सायंकाळी ४ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संविधान चौक, साळुंखे विहार रोड आणि फ्लॉवर व्हॅली लेन या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ या वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या स्थितीनुसार वाहतूक नियमन केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक लागू केली जाईल, तर काही मार्ग पूर्णपणे बंद करून वाहनांसाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. तसेच वाहतूक पोलिसांकडून सूचित करण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

पुणेकरांनो लक्ष द्या! २५ सप्टेंबरला 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद

पुणेकरांनो लक्ष द्या! २५ सप्टेंबरला 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद

२५ सप्टेंबरला पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार. पुणे पोलिसांनी वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि पार्किंगबाबत सूचना दिल्या.

Sep 23, 2026
गणेशोत्सवात पुण्यात जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी; १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बदल

गणेशोत्सवात पुण्यात जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी; १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतूक बदल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान १२ प्रमुख मार्गांवर जड-अवजड वाहनांना २४ तास बंदी राहणार आहे.

Sep 10, 2026
उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

उमरी खुर्द येथे ना. संजय राठोड यांची हजेरी; संत जेतालाल महाराजांचे घेतले दर्शन

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरी खुर्द तीर्थक्षेत्री कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थिती लाभली.

Sep 05, 2026
पुण्यात दहीहंडी उत्सवात DJचा दणका; ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

पुण्यात दहीहंडी उत्सवात DJचा दणका; ८ बेस आणि ८ टॉप स्पीकर लावणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल

पुण्यात दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर DJच्या आवाजाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Sep 05, 2026
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला; जन्माष्टमीला घरी कन्यारत्न

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

Sep 05, 2026