Rajyamata Gomata Samvad Yatra

पातूरमध्ये राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे पातूर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

पातूरमध्ये राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

पातूर : पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे पातूर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या यात्रेत पातूर शहरातील शेतकरी, गोसेवक, गोरक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२२ जून ते ५ जुलै या कालावधीत राज्यातील ३६ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणारी ही संवाद यात्रा गोसंवर्धन, गोपालन आणि गोसेवेबाबत जनजागृती करत असून आतापर्यंत २३ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून पातूर येथील डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात दाखल झाली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरणकुमार खंडारे, कर्मचारीवृंद, पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक डॉ. शिवकुमारसिंह बायस तसेच विविध सामाजिक संस्था आणि गोप्रेमी यांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा यांनी संवाद यात्रेचा उद्देश, गोवंश संवर्धनाचे महत्त्व आणि समाजातील जनजागृतीची आवश्यकता याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी संवाद यात्रेचे मुख्य सारथी नितीन चिलवंत, गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सुर्यवंशी, सदस्य उद्धव नेरकर, महाएनजीओ फेडरेशनचे मुकुंद शिंदे, स्वीय सहायक राहूल जगताप, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई सलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतीश सरोदे, प्रा. अतुल विखे, प्रा. व्ही. जी. वसू, डॉ. दिपाली घोगरे, प्रा. अरविंद भोंगळे, डॉ. संजय खांदेल, अनिल चव्हाण, चंद्रकांत अमानकर, प्रसिद्ध उद्योजक छोटू जोशी, निलेश धरमकार, धारकरी विजय राऊत तसेच अनेक गणमान्य गोभक्त नागरिक उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026