६ महिन्यांपासून धान्य बंद! कोरपना तहसीलमध्ये अन्नपुरवठा घोटाळ्याचा स्फोट

तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडकीस आला असून, तब्बल ६ महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे.

६ महिन्यांपासून धान्य बंद! कोरपना तहसीलमध्ये अन्नपुरवठा घोटाळ्याचा स्फोट

Ration Scam

 “नितीन बावणे” यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांचा उठाव

कोरपना (Ration Scam) : तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडकीस आला असून, तब्बल ६ महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. या अन्यायाविरोधात नगरसेवक नितीन बावणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी तहसील कार्यालयावर उठाव पुकारत या प्रकरणाला जोरदार वाचा फोडली.

निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे यांच्या कारभारावर गंभीर आरोप होत असून, कोणतेही स्पष्ट कारण न देता अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस तसेच काही गरीब महिलांचे अन्नधान्य अचानक बंद करण्यात आले आहे. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न पुरवठा विभाग (कंट्रोल) तर्फे मिळणारे नियमित धान्य कोणतीही पूर्वसूचना न देता थांबविण्यात आले.

या संदर्भात महिलांनी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, इतकेच नव्हे तर काही महिलांशी अश्लील भाषेत वर्तन केल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत. “हे मी केले नाही, तहसीलदार मॅडमना विचारा” असे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून येतो.

 सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे – “देवघरे हा अधिकारी अनाज सुरू करून देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मागणी करत आहे,” असा गंभीर आरोप संतप्त महिलांनी केला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे, काही अशा महिलांचेही धान्य बंद करण्यात आले आहे की त्या ना अंगणवाडी सेविका आहेत, ना आशा वर्कर — तरीही त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यावर गदा आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांवर अन्याय होत असून उपासमारीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, या आंदोलनावेळी नितीन बावणे यांनी स्पष्ट भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. त्यांनी सांगितले की, “कोरपना शहरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस यांना वेतन नसून फक्त मानधन दिले जाते. त्यामुळे त्यांना मिळणारे स्वस्त धान्य बंद करणे हा सरळ अन्याय आहे. जर अशा निकषांवर धान्य बंद करायचे असेल, तर संपूर्ण तालुका, जिल्हा आणि राज्यातील ज्या नागरिकांना शासकीय मानधन मिळते, अशा सर्वांचेच धान्य बंद करावे — अन्यथा हा दुजाभाव थांबवावा!”

या ठाम भूमिकेमुळे उपस्थित महिलांचा संताप अधिकच उफाळून आला आणि तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी आरोप केला की, कोणतेही कारण न देता धान्य बंद करणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे, जबाबदारी टाळणे आणि गरीब कुटुंबांना उपासमारीच्या दारात ढकलणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.

सध्या या प्रकरणामुळे कोरपना परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, “गरीबांना न्याय मिळणार का?” हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक नितीन बावणे व संतप्त महिलांकडून देण्यात आला आहे.

सदर प्रकरणाबाबत प्रतिक्रियासाठी तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे यांना भ्रमनध्वनी द्वारे वारंवार संपर्क साधला असता फोन स्वीकारला नाही

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026