रिसोड गॅस सिलेंडर आंदोलन

रिसोडच्या तहसीलवर 'चुलीचा' धूर; गॅसअभावी वंचितांची 'भाकरी' थापून निदर्शनं!

Risod Gas Cylinder Andolan: रिसोड तहसील कार्यालयाच्या परिसरात वंचित बहुजन आघाडीने गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविरुद्ध चुल पेटवून आंदोलन केले, तीव्र निषेध व्यक्त केला.

रिसोडच्या तहसीलवर 'चुलीचा' धूर; गॅसअभावी वंचितांची 'भाकरी' थापून निदर्शनं!

Risod Gas Cylinder Andolan

रिसोड (Risod Gas Cylinder Andolan) : "नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?" अशा गगनभेदी घोषणा आणि चुल पेटवून त्यावर भाकरी थापत आज रिसोड तहसील कार्यालयाचा परिसर वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाने दणाणून गेला. तालुक्यात गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (६ एप्रिल)अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदवला.

विशेष म्हणजे प्रशासकीय उंबरठ्यावर मांडली चूल

गेल्या काही दिवसांपासून रिसोड शहर आणि तालुक्यात (Risod Gas Cylinder Andolan) गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार मागणी करूनही सर्वसामान्यांना सिलेंडर मिळत नसल्याने गृहिणींचे स्वयंपाकघर कोलमडले आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला.कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालया समोरच लाकडे जमवून चूल पेटवली. भर उन्हात चुलीवर भाकरी थापून 'अच्छे दिन'च्या घोषणांचा अक्षरशः धूर काढला.'नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?'च्या घोषणांनी परिसर दणाणला आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

"सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या असताना आता ते मिळेनासेही झाले आहेत, मग सर्वसामान्यांनी जगायचे कसे?" असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
 "नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर?" या घोषणांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Risod Gas Cylinder Andolan) रिकामे सिलेंडर समोर ठेवून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे तहसील परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

तहसीलदारांना दिले निवेदन
आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार तेजनकर मॅडम यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष महेश तिडके, जेष्ठ नेते रविंद्र मोरे, गिरिधर शेजुळ, विजय सिरसाट, शालिग्राम पठाडे,माधव हिवाळे,माजी शहराध्यक्ष प्रदिप खंडारे,जियाउर खान, गजानन खंडारे,मंदाताई वाघमारे, मंदाताई धांडे,प्रकाश गवई, कैलास सर्वे,विनोद अंभोरे, अरुण बोरकर,गजानन शिंदे, सदानंद गायकवाड, दत्ताराव जुमडे,कैलास पंडित,प्रशांत मोरे, संदिप मोरे, समाधान जमधाडे,गुलाब मस्के,मंगेश राजुरकर,विनोद भगत, जितेंद्र जमदाडे,प्रविण खैरे,धनंजय पंडित,शुभम लेमाडे, शुभम जुमडे,आव्हाट,व आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026