शाळेतच असुरक्षितता! इगतपुरीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तनामुळे संतापाची लाट

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद परिसरातून शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

शाळेतच असुरक्षितता! इगतपुरीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तनामुळे संतापाची लाट

School Crime

नाशिक (School Crime) : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद परिसरातून शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका शाळेतील शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी आपल्या भावासह शाळेत काही शैक्षणिक कागदपत्रांवर सही आणि शिक्का घेण्यासाठी गेली होती. त्या वेळी मुख्याध्यापक बैठकीत व्यस्त असल्याचे सांगून संबंधित शिक्षकाने मदत करण्याचा बहाणा केला. “मीच तुला सही-शिक्के करून देतो,” असे सांगत त्याने मुलीच्या भावाला कक्षाबाहेर थांबण्यास सांगितले आणि विद्यार्थिनीला एकटीला आत बोलावले.

कक्षात इतर कोणीही नसल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करत तिच्याकडे अयोग्य मागण्या केल्याने मुलगी घाबरून गेली. परिस्थितीची जाणीव होताच तिने तत्काळ कागदपत्रे हातात घेतली आणि कोणत्याही प्रकारे स्वतःची सुटका करून बाहेर पळ काढला.

घरी परतल्यानंतर मुलगी अत्यंत घाबरलेली व रडत असल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने शाळेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकताच संतप्त पालकांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली आणि सर्वजण शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारण्यासाठी एकत्र जमले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांना कळविण्यात आले. घोटी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी आरोपी शिक्षक अर्जुन गबाजी हरिश्चंद्रे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही तिला उपमुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले होते. “तू सातवीत असताना अशी दिसत नव्हतीस, आता आठवीत आल्यावर बदलली आहेस,” अशा प्रकारच्या अयोग्य टिप्पणी करत तिच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीला मोठा मानसिक धक्का बसला असून तिच्या कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शाळा प्रशासनाविरोधातही रोष वाढला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, याच शाळेत वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली होती. त्या वेळी मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांच्यावर १३ वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सलग दोन गंभीर घटनांमुळे संबंधित शैक्षणिक संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिक्षण विभागाकडून संस्थेविरुद्ध व संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026