विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

विदर्भातील शाळा १५ जून तसेच त्यानंतर २२ जूनपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहेत.

विदर्भातील शाळा ३० जूननंतरच सुरू होणार

School Reopening Date

उच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश; शासनाची दोन्ही परिपत्रके रद्द

नागपूर (School Reopening Date) : विदर्भातील शाळा १५ जून तसेच त्यानंतर २२ जूनपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविले आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळा पूर्वीच्या शासन धोरणानुसार ३० जूननंतरच सुरू कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे आणि नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी विदर्भातील जून महिन्यातील तीव्र उष्णतेचा मुद्दा उपस्थित केला. अनेक भागांत तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठे अंतर पायी पार करावे लागते, हाही मुद्दा मांडण्यात आला.

यापूर्वीच्या न्यायालयीन आदेशांचा तसेच विदर्भासाठी स्वतंत्र शैक्षणिक वेळापत्रक निश्चित करणाऱ्या शासन निर्णयांचा संदर्भही यावेळी देण्यात आला. २०२३ मध्ये राज्य शासनाने विदर्भातील हवामानाचा विचार करून शाळा जूनअखेरनंतर सुरू करण्याचे धोरण स्वीकारले होते. असे असताना शिक्षण विभागाने नव्याने परिपत्रके काढून शाळा १५ जून व नंतर २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली.

सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर खंडपीठाने २८ मार्च २०२६ तसेच त्यानंतर जारी करण्यात आलेली दोन्ही परिपत्रके रद्द केली. परिणामी, विदर्भातील शाळा पूर्वनिश्चित धोरणानुसारच सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

 

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026