वानर पिल्ले जीवदान

प्रसंगावधानाने वाचले दोन जीव! लाईनमनने चालू खांबावरील वानर माता-पिल्लाला दिले जीवदान

Baby monkey life Save: खांबावर जाऊन बाधका झालेल्या वानर मातेच्या निस्वार्थपणामुळे त्याच्याही पिल्ला व शिंदे यांची सहायता करून खाजगी विद्युत खांबावर चढल्या.

प्रसंगावधानाने वाचले दोन जीव! लाईनमनने चालू खांबावरील वानर माता-पिल्लाला दिले जीवदान

Baby monkey life Save

हिंगोली (Baby monkey life Save) : माणुसकी आणि कर्तव्याची जाणीव दाखवणारी घटना हिंगोली तालुक्यातील वसई गावात घडली. भटक्या कुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी चालू विद्युत खांबावर चढलेल्या वानर माता आणि तिच्या पिल्लाला लाईनमनच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे नवीन आयुष्य मिळाले.

११ जुलै रोजी वसई गावात एका वानर मादीच्या पाठीमागे काही भटकी कुत्री लागली होती. त्या वेळी मादीच्या कुशीत तिचे लहान पिल्लू स्तनपान करत होते. घाबरलेल्या अवस्थेत पळण्यासाठी जवळपास कोणतेही झाड नसल्याने वानर मादीने पर्याय नसल्याने थेट चालू विद्युत खांब गाठला. आपल्या  (Baby monkey life Save) पिल्लाला घट्ट धरून ती खांबाच्या आधारावर बसून राहिली. ही धोकादायक परिस्थिती लाईनमन शिंदे यांच्या नजरेस पडली.

क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद केला. त्यानंतर त्यांनी कुत्र्यांना हाकलून दिले आणि स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता खांबाजवळ जाऊन वानर माता व पिल्लाला सुरक्षितपणे खाली उतरवले. शिंदे यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी कृतीमुळे केवळ दोन मुक्या जीवांचेच प्राण वाचले नाहीत तर संभाव्य मोठा विद्युत अपघातही टळला. या घटनेनंतर गावकर्‍यांनी शिंदे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. कर्तव्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता यामुळे आज वसई गावात त्यांच्या या कामाची सर्वत्र चर्चा आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोलीत ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाच्या उद्घाटन व आयोजन प्रसंगी राज्य समन्वयक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सावंत, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे तसेच नगरसेवक कपिल भैया खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jun 12, 2026
हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’; नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

हिंगोली येथे ६ जून रोजी भव्य ‘शिवकुटुंब मेळावा’; नियोजन बैठकीत १०० कुटुंबांच्या सहभागाचा निर्धार

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्षांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जून २०२६ रोजी हिंगोली येथे आयोजित ‘शिवकुटुंब मेळाव्या’च्या पार्श्वभूमीवर बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

May 23, 2026
हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

हिंगोलीतील श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा

श्रीमद् भागवत कथेनिमित्त रामलीला मैदानावर 22 मार्च रोजी भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

Mar 23, 2026