सेनगाव पोलिस कारवाई

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

Sengaon Police Action: सेनगाव पोलिस ठाण्याला वार्षिक तपासणी झाली. तपासणीतील लपविलेल्या अवैध धंद्यांबद्दल पाटलांवर कायदा कारवाई करण्याचे निर्णय.

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

Sengaon Police Action

सेनगाव (Sengaon Police Action) : सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी बुधवारी (ता. २६) केली. यावेळी पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतीने पूर्ण करून कोणतेही गुन्हे प्रलंबित राहणार नाहीत, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. तपासणीदरम्यान पोलिस ठाण्यातील विविध नोंदी, गुन्हे तपासाची स्थिती आणि कामकाजाची पाहणी करून डॉ. लोढा यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

दरम्यान, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी हस्तगत केलेले दागिने व अन्य मुद्देमाल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. लोढा यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना वितरित करण्यात आला. तसेच पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांतील पोलीस पाटलांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांची सुरक्षा, तसेच गावातील विविध घडामोडींविषयी पोलिसांना वेळेत माहिती देण्याबाबत डॉ. लोढा यांनी मार्गदर्शन केले.

गावातील अवैध धंदे अथवा बेकायदेशीर व्यवसायांची माहिती पोलीस पाटलांनी पोलिस यंत्रणेला देणे आवश्यक आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. श्रेणिक लोढा यांनी बैठकीत दिला. यावेळी सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, नागेश शेट्टीवार यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

ऐवज हातात पडताच फिर्यादीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; पोलिसांच्या कामगिरीचे एसपींनी केले कौतुक

ऐवज हातात पडताच फिर्यादीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; पोलिसांच्या कामगिरीचे एसपींनी केले कौतुक

Sengaon Police Action: गुन्हा घडतो, तपास सुरू होतो आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नातून चोरीला गेलेला ऐवज पुन्हा आपल्या मालकाच्या हातात पडतो... हा क्षण फिर्यादीसाठी समाधानाचा असतो.

Aug 26, 2026
जनावरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद' हरियाणाचे चौघे पसार

जनावरे चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद' हरियाणाचे चौघे पसार

Latur cattle smuggling: लातूर मराठवाड्यातील ४१ जनावर चोरीसाठी आंतरराज्यीय टोळीच्या पट्ट्यामध्ये २४.६८ लाखांची रकम जप्त करण्यात यश मिळाले; सांख्यिकेने पोलिसांनी गुन्हा उघडले.

Aug 07, 2026
रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.

Jul 05, 2026
परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

परभणीत एटीएम फोडून साडेपाच लाखांची रोकड लंपास; सीसीटीव्हीला चिखल लावून चोरट्यांचा डाव यशस्वी

UCO Bank ATM: नव्या मोंढा एटीएमवर सीसीटीवी कॅमेरावर चिखल फोडून रोकड लंपास करणारे गुन्हेगार दिशा बदलण्याच्या साठी चालू केले. युको बँकेच्या ५ लाख ५६ हजार रोप्यांची चोरी झालेली घटना परभणीत भेटलेली.

Jul 01, 2026
तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली केलेल्या चर्चेतील ३९ पोलिसांना फेर आदेशाचे लागले डोहाळे

तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी बदली केलेल्या चर्चेतील ३९ पोलिसांना फेर आदेशाचे लागले डोहाळे

Superintendent of Police Transfer: जिल्हा पोलिस अधिकारींच्या सर्वसाधारण बदलाने हिंगोलीत अन्याय आणि लघबळ उडवले. नूतन अधीकक्षकांनी पूर्वीच्या आदेशावर फेरपणाचा अपेक्षा केला

Jun 28, 2026