सेनगाव पोलिस कामगिरी

ऐवज हातात पडताच फिर्यादीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; पोलिसांच्या कामगिरीचे एसपींनी केले कौतुक

Sengaon Police Action: गुन्हा घडतो, तपास सुरू होतो आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नातून चोरीला गेलेला ऐवज पुन्हा आपल्या मालकाच्या हातात पडतो... हा क्षण फिर्यादीसाठी समाधानाचा असतो.

ऐवज हातात पडताच फिर्यादीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; पोलिसांच्या कामगिरीचे एसपींनी केले कौतुक

Sengaon Police Action

 

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी

सेनगाव (Sengaon Police Action) : गुन्हा घडतो, तपास सुरू होतो आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नातून चोरीला गेलेला ऐवज पुन्हा आपल्या मालकाच्या हातात पडतो... हा क्षण फिर्यादीसाठी समाधानाचा असतो. सेनगाव पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान असाच भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. पोलिसांनी विविध तीन गुन्ह्यांत हस्तगत केलेले दागिने व अन्य मुद्देमाल संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन केला. ऐवज पुन्हा हातात मिळताच फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. या कामगिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी कौतुक केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी बुधवारी ता. २६ रोजी सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील विविध नोंदी, गुन्हे तपासाची स्थिती, प्रलंबित प्रकरणे आणि एकूण कामकाजाची पाहणी केली. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास गतीने पूर्ण करून कोणतेही प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तपास करून हस्तगत केलेले दागिने व अन्य मुद्देमाल संबंधित मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. डॉ. लोढा यांच्या हस्ते हा ऐवज संबंधितांना देण्यात आला. अनेक दिवसांनंतर आपला मौल्यवान ऐवज पुन्हा मिळाल्याने फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. पोलिसांच्या तपासामुळे नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

तपासणीच्या निमित्ताने पोलिस ठाणे परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. लोढा यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांच्या पोलीस पाटलांची आढावा बैठक घेण्यात आली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांचे संरक्षण करणे तसेच गावातील संशयास्पद व महत्त्वाच्या घडामोडींची माहिती पोलिसांना वेळेत देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

गावातील अवैध धंदे, बेकायदेशीर व्यवसाय अथवा अन्य गैरप्रकारांची माहिती पोलीस पाटलांनी पोलिस यंत्रणेला देणे आवश्यक आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस पाटलांवरही कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा डॉ. श्रेणिक लोढा यांनी दिला. त्यामुळे गावपातळीवर अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

यावेळी सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, नागेश शेट्टीवार यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

सेनगाव पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी; अवैध धंद्यांची माहिती लपविल्यास पोलीस पाटलांवर कारवाई

Sengaon Police Action: सेनगाव पोलिस ठाण्याला वार्षिक तपासणी झाली. तपासणीतील लपविलेल्या अवैध धंद्यांबद्दल पाटलांवर कायदा कारवाई करण्याचे निर्णय.

Aug 26, 2026
महिलांवर पाळत ठेवून दागिने चोरणारी महिला चिखली डी.बी. पथकाच्या जाळ्यात

महिलांवर पाळत ठेवून दागिने चोरणारी महिला चिखली डी.बी. पथकाच्या जाळ्यात

Jewel thief woman: चिखली पोलिसांनी महिला चोरट्या सुवर्णा काकासाहेब काळेला डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून पकडले. त्यांनी चोरीस गेलेले सुमारे ३१,९५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

Jun 03, 2026