Sexual Assault Case

नागपूर मध्ये निर्भय उर्फ आकाश पाखरेचा पोलीस कोठडीत व्हीआयपी सुविधांसाठी हट्ट; तपासातही असहकार्य कायम

आकाश पाखरे याचे पोलिस तपासात असहकार्य सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर मध्ये निर्भय उर्फ आकाश पाखरेचा पोलीस कोठडीत व्हीआयपी सुविधांसाठी हट्ट; तपासातही असहकार्य कायम

अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने पिझ्झा, मऊ बिछाना आणि विशेष सोयींची मागणी; मोबाईलचा पासवर्ड देण्यासही नकार

नागपूरातील सरकारी अधिकाऱ्याच्या 16 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्भय उर्फ आकाश पाखरे याचे पोलिस तपासात असहकार्य सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कोठडीत गेल्या तीन दिवसांपासून तो चौकशीत सहकार्य करत नसून, त्याचबरोबर व्हीआयपी स्वरूपाच्या सोयीसुविधांचीही मागणी करत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने कोठडीतील अस्वच्छ वातावरण, भिंतींची अवस्था आणि दुर्गंधीयुक्त शौचालयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नाश्त्यासाठी पिझ्झा, रात्रीच्या जेवणासाठी दर्जेदार भोजन, जाड गादी, मऊ बिछाना आणि कीटकनाशक फवारणीची मागणीही त्याने केली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मंगळवारी न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी पोलिसांकडून अरेरावी झाल्याचा आरोप केल्यानंतर आरोपीने चौकशीतही सहकार्य करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेसमोर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मोबाईलचा पासवर्ड आणि डिजिटल पुराव्यांबाबतही नकार

हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेपासून आरोपीने तपासासाठी आवश्यक कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याने स्वतःच्या मोबाईलचा पासवर्ड देण्यास नकार दिला असून, पीडितेकडून हिसकावलेला मोबाईलही पोलिसांकडे सुपूर्द केलेला नाही. त्यामुळे डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अधिक कठीण झाले आहे.

वैद्यकीय तपासणीबाबतही सहकार्य नाही

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांबाबतही सहकार्य केलेले नाही. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही तपासण्या जबरदस्तीने कराव्या लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

कोठडीत सतत वाद, पोलिसांवर गंभीर आरोप

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी लॉकअपमधील कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी सातत्याने वाद घालत आहे. तसेच या प्रकरणात 16 वर्षीय मुलीलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न तो करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

मंगळवारी विशेष न्यायाधीशांसमोर हजर असताना आरोपीने पोलिसांवरही गंभीर आरोप केले. आपल्या भाड्याच्या फ्लॅटमधून 70 हजार रुपये चोरीला गेल्याचा, तसेच पोलिसांनी मारहाण करून चष्मा आणि बूट परत दिले नसल्याचा आरोप त्याने केला. त्याच्या वकिलांनी न्यायालयात आरोपी स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी भूमिकाही मांडली.

24 तास देखरेखीखाली आरोपी

या प्रकरणाबाबत हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी सांगितले की, पोलिसांकडून आरोपीला आवश्यक ते सहकार्य करण्यात आले आहे. मात्र, तो आलिशान सुविधा, मऊ बिछाना आणि विशेष भोजनाची मागणी करत असून चौकशीत सहकार्य करण्यास नकार देत आहे. आरोपीला समुपदेशन केले जात असून त्याने आत्मघाताचा प्रयत्न करू नये म्हणून त्याच्यावर 24 तास देखरेख ठेवण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026
रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

रात्री भेटायला गेली... परतलीच नाही; दोन दिवसांनी शेतात आढळला मृतदेह; दिल्लीतील क्रूर हत्याकांड

दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये १६ वर्षीय मुलीची हत्या. ५० हून अधिक CCTV तपासल्यानंतर १९ वर्षीय तरुणाला अटक, तीन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात.

Sep 18, 2026