Shakuntalabai Mahale

मासरूळच्या सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुण्यात 'सह्याद्रीरत्न गुणगौरव' पुरस्कार

बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' मध्ये 'सह्याद्रीरत्न गुणगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

मासरूळच्या सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुण्यात 'सह्याद्रीरत्न गुणगौरव' पुरस्कार

Shakuntalabai Mahale

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' मध्ये 'सह्याद्रीरत्न गुणगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

समाजात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत गावाच्या विकासासाठी विविध कामे राबवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. गावातील स्वच्छता व्यवस्थेसाठी घनकचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे, सिमेंट रस्ते व नाली बांधकाम, चक्रधर स्वामी कमान, चक्रधर स्वामी मंदिरासाठी सभागृह, ग्रामपंचायत भवन, पाधन रस्ता, अल्हाटवाडी डांबरी रस्ता, शनिश्वर वाडी सिमेंट रस्ता, गावातील बारी, समाजासाठी मोठे मंगल कार्यालय, माळी समाजासाठी सभागृह, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ योजना तसेच वसुंधरा योजनेसारखे विविध विकासकामे गावात राबविण्यात आली. या कार्याचा विचार करून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला ARJ एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मा. जितेंद्र तुळशीराम दाते तसेच 'देऊळ बंद' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, सेवा, आरोग्य, कला, शिक्षण, उद्योग तसेच विविध संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

पुरस्काराचे स्वरूप भव्य असून प्रत्येक गुणवंताला सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची ओळख समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे मा. जितेंद्र तुळशीराम दाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "उद्योग आणि समाजसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना जेव्हा असा सन्मान मिळतो, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी वाढते. समाजातील गुणीजनांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे."

तर अभिनेत्री आर्या घारे यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना, "कला आणि समाजकार्यासाठी दिलेले हे योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल," असे मत व्यक्त केले.

हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा महाउत्सव ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सन्मानित व्यक्तींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाला माजी सरपंच शेषराव सावळे, दिलीप शिनकर, मधुकर महाले, नंदकिशोर देशमुख, कृष्णा सिनकर आणि बाळू सपकाळ यांची उपस्थिती होती.

 

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026