शेतकरी संघर्ष न्याय यात्रा

उद्या 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रा

Shetkari Sangharsh Nyaya Yatra: महाराष्ट्रात काँग्रेसचे आयोजन केलेल्या 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रा'मध्ये हजारो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार. यात्रेचा उद्देश शेतकरी प्रश्नांना वाचा फोडणे आहे.

उद्या 'शेतकरी संघर्ष न्याय यात्रा

Shetkari Sangharsh Nyaya Yatra

जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते धाराशिवकडे कूच करणार: साळुंके 

लातूर (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित "शेतकरी संघर्ष न्याय यात्रा" सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये लातूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने या संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेचा प्रारंभ सोमवार, दि. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता सोलापूर-तुळजापूर हायवेवरील सुरतगाव (जि. धाराशिव) येथून होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या यात्रेचा समारोप त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता तुळजापूर येथे होईल.

या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेच्या नियोजनासाठी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री आ. अमित विलासरावजी देशमुख, खा.डॉ. शिवाजी काळगे व प्रदेश प्रवक्ते तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांना (ग्रामीण व शहर)  आपापल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा मराठवाड्याच्या अस्मितेचा आणि शेतकरी एकजुटीचा हुंकार ठरणार आहे.

या (Shetkari Sangharsh Nyaya Yatra) यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांचे नगरसेवक, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस रस्त्यावर

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, या यात्रेसाठी लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर अनंतपाळ या सर्व तालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात धाराशिवकडे रवाना होणार आहेत. "शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून, लातूर जिल्हा या आंदोलनात अग्रभागी असेल," असा विश्वास अभय साळुंके यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026